मुंबई :  अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण अनेक सिनेमांमधून चाहत्यांच्या भेटीस आले. सिनेमांमधील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडली. फक्त रिल लाईफमध्येचं नाही, तर रिअल लाईफमध्ये देखील दोघं चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. दीपिका आणि रणवीरने एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर अखेर 2018 साली मोठ्या थाटात लग्न केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीमध्ये रंगलेल्या या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता दोघांच्या लग्नाना 4 वर्ष झाली आहेत. त्यामुळे चाहते कायम दोघांना बेबी प्लानिंगबद्दल विचारत असतात. 


पण अनेकदा दोघांनी व्यस्त वेळापत्रकामुळे अद्याप बाळाचा विचार करत नसल्याचं सांगितलं. पण आता पुन्हा रणवीरला 'इंडियन पुलिस फोर्स' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान बेबी प्लानिंगबद्दल विचारण्यात आलं. 


या प्रश्नाचं उत्तर देताना रणवीर म्हणाला, 'दीपिका सध्या कान्स फेस्टिवलला गेली आहे. त्यामुळे ती जेव्हा येईल तेव्हा तिलाचं या प्रश्नाचं उत्तर विचारा...' असं वक्तव्य रणबीरने केलं. 


यापूर्वी रणवीरला तुम्हाला मुलगा हवाय, की मुलगी? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा रणवीर म्हणाला, 'जे काही होईल तो देवाचा आशीर्वाद असेल...' त्यामुळे रणवीर आणि दीपिका कधी चाहत्यांनी 'गुडन्यूज' देणार याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.