मुंबई : संजय लीला भन्साली यांच्या आगामी बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिकाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. आज घटस्थापनेच्या दिवशी हा लूक रिलीज करण्यात आला असून यासोबतच सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणी पद्मिनी अर्थात दीपिकाचा फर्स्ट लूक ‘पद्मावती’ सिनेमाच्या ऑफिशियल ट्विटर पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. रणवीर, शाहीद, दीपिका आणि भन्साळी यांनी आधीपासूनच इन्स्टाग्रामवर त्याबाबत माहिती दिली होती. 




‘पद्मावती’ हा सिनेमा आधी एप्रिल महिन्यात रिलीज होणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु चाहत्यांना आनंदाचा धक्का देत यावर्षीच हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं भन्साळींनी जाहीर केलं आहे. एक डिसेंबर २०१७ रोजी पद्मावती रिलीज होणार आहे.