मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पादूकोण आपसूकच चर्चेत राहतात... हे दोघे एकत्र आहेत आणि त्यावर माध्यमांच्या कॅमेऱ्याचं लक्ष गेलं नाही, असं होत नाही. या दोघांच्या लग्नानंतर एकही वेळ अशी गेली नाही जिथे रणवीर दीपिकाबद्दल आणि दीपिका रणवीरबद्दल बोलली नसेल... अनेकदा दोघंही एकमेकांचं कौतुक करताना थकत नाहीत. दोघं सुरुवातीपासूनच म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच एकमेकांच्या कामाचं कौतुक करताना दिसत होते... पण, लग्नानंतर मात्र रणवीरच्या काही गोष्टी बदलल्याचं जाणवतंय... खुद्द रणवीरनंच तशी स्पष्टोक्ती दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर-दीपिकानं विवाहबंधनात अडकून २०१८ साल आपल्या नावावर नोंदवलं. या वर्षातलं हे सर्वात हीट कपल ठरलं. पण, लग्नानंतर दीपिकानं आपल्या तीन सवयींना आळा घातल्याचं रणवीरनं म्हटलंय.


लग्नानंतर दीपिकानं आपल्याला काही गोष्टी बंद करायला भाग पाडल्याचं रणवीरनं म्हटलं. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे, रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं... लग्नानंतर कामाशिवाय रात्री उशिरापर्यंत बाहेर राहण्यास त्याच्या दीपिकानं बंद करायला भाग पाडलंय. 


दुसरी गोष्ट म्हणजे, सकाळी घराबाहेर पडताना काही खाल्याशिवाय बाहेर पडणं... हीदेखील सवय रणवीरला लग्नानंतर मोडावी लागलीय. अर्थातच दीपिका स्वत: सोबतच रणवीरच्या आरोग्याची काळजी घेताना दिसतेय. त्यामुळे सकाळी काहीतरी खाल्ल्यानंतरच घराबाहेर पडायचं, असा दंडकच तिनं घराला घातलाय. 


तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्नी अर्थात दीपिकाचे कॉल रणवीरला यापुढे टाळता येणार नाहीत.  रणवीरच्या या स्पष्टोक्तीतून या दोघांचं नातं विवाहानंतर आणखीनच फुलत असल्याचंच दिसतंय.