Deepika Padukone At Diljit Dosanjh Concert: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी यावर्षी सप्टेंबरमध्ये मुलगी दुआचे स्वागत केले. रणवीर सिंह दुआच्या जन्मानंतर अनेकवेळा दिसला आहे, मात्र दीपिकाला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. अलीकडेच दीपिका पदुकोण पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझच्या बेंगळुरू कॉन्सर्टमध्ये दिसली होती. मुलीच्या जन्मानंतरचा दीपिकाचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे. स्टेजवर डान्स करताना दीपिकाला सगळे बघून भारावून गेले. 



दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये दीपिकाला पाहून चाहतेही खूप खूष दिसत होते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्री दीपिका व्हाईट स्वेटशर्ट आणि ब्लू जीन्स घालून स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. तसेच, तिने आपले केस मोकळे ठेवले आहेत आणि दिलजीत तसेच तेथे उपस्थित असलेल्या चाहत्यांशी माइकमध्ये बोलताना दिसत आहे. प्रसूतीनंतर, दीपिकाच्या चेहऱ्यावरील चमक स्पष्टपणे दिसू शकते, ज्याने सर्व लाइमलाइट चोरले.



दीपिकाच्या कंपनीचा बॉडीवॉश वापरत असल्याचं यावेळी दिलजीतने सांगितलं. दिलजीत स्टेजवरुन चाहत्यांशी संवाद साधत असताना दीपिका स्टेजच्या मागे लपून हे पाहत होते. 


आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली दीपिका



या कॉन्सर्टचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दीपिका समोर बसून दिलजीतच्या शानदार परफॉर्मन्सचा आनंद लुटताना दिसत आहे. तर तिच्या आजूबाजूचे चाहते गाताना आणि जल्लोष करताना दिसत आहेत. यानंतर दिलजीत दीपिकाला स्टेजवर बोलावतो आणि ती येऊन छान बंगलुरुकरांशी संवाद साधते आणि डान्स करताना दिसते.