दीपिका पदुकोणचा हा बोल्ड फोटो पाहिलात का?
दीपिकाने काळ्या रंगाचा आणि चंदेरी ठिपके असलेला ड्रेस घातला आहे.
मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा एले मॅगझिनच्या मुखपृष्ठावरील फोटो सध्या इंडस्ट्रीत चर्चेचा विषय आहे. यापूर्वीही दीपिकाने अनेक मासिकांसाठी फोटोशूट केली आहेत. मात्र, एलेच्या मुखपृष्ठावरील दीपिकाचा बोल्ड अंदाज पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. एले मासिकाच्या यावेळच्या अंकात दीपिका पदुकोणवरील कव्हर स्टोरी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये दीपिकाचे वैयक्तिक जीवन, तिचा बॉलीवूडमधील आतापर्यंतचा प्रवास, स्टारपद अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एलेच्या मुखपृष्ठावरील या फोटोत काळ्या रंगाचा आणि चंदेरी ठिपके असलेला ड्रेस घातला आहे. यासोबतच दीपिकाची वैशिष्ट्यपूर्ण केशरचना आणि वेशभुषा लक्ष वेधून घेत आहे.