Deepika Padukone Mukesh Ambani: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे DeepVeer ची. त्यातून दीपिका पादूकोणची. दीपिका पादूकोण ही लोकप्रिय अभिनेत्री आहेच परंतु त्याचसोबत ती तिच्या हटके स्टाईलसाठीही ओळखली जाते. सध्या तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं खास आपला लाडका मित्र आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या फॅशन शोला हजेरी लावली होती. यावेळी त्यानं आपल्या फॅशन स्टाईलनं सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली होती. त्यामुळे तिची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली होती. रणवीर आणि आलियाच्या रॅम्पवॉकच्या निमित्तानं तिनंही हजेरी लावली होती. यावेळी फक्त दीपिकाचं नाही तर अन्य मान्यवरही उपस्थित होते. मुकेश अंबानी आपल्या आई कोकिलाबेन अंबानी यांच्यासह यावेळी आले आहे. त्याचसोबत रणवीरची आई म्हणजे दीपिका पादूकोणच्या सासूबाईही आलेल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाचा आऊटफिट यावेळी प्रचंड वेगळा आणि आकर्षक होता. तिनं चक्क यावेळी पांढरीशुभ्र साडी तर परिधान केली होतीच परंतु त्यासोबतच तिनं ब्लॅकलेस ब्लाऊज घातला होता. त्यामुळे तिचा हा बोल्ड अंदाज पाहून सर्वांच्याच नजरा वळल्या होत्या. यावेळी मात्र नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. त्यामुळे असा बॅकलेस टॉप घालणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. अशावेळी तिला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलंय जाणून घेऊया की नक्की यावेळी घडलं काय आहे? तिचा आणि मुकेश अंबानी यांचाही एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात ते सोहळा संपल्यांवर एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत. 


हेही वाचा - इरसालवाडीतील दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला धावून आली मराठी अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली...


यावेळी हा शो मनीष मल्होत्रानं आयोजित केला होता. यावेळी त्याचे ब्राईडल आणि वेडिंग कलेक्शन त्यानं शेअर केले होते. त्याच्या कलेक्शनला यावेळी भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थितांचा प्रतिसाद आलेला मिळाला होता त्यामुळे त्याचीच सर्वत्र चर्चा होती. यावेळी या फॅशन शोला करण जोहर आपली 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रमोट करण्यासाठी आला होता. त्यामुळे त्याची फारच चांगली चर्चा रंगलेली होती. यावेळी शोजस्टॉपर म्हणून रॉकी आणि रानी म्हणजेच रणवीर सिंग आणि आलिया भट्ट होते. आलियानं यावेळी सुंदर लेहेंगा चोळी घातली होती तर रणवीर शेरवानी परिधान केली होती. यावेळी कोकिलाबेन अंबानीही पोहचल्या होत्या. त्यांनी गुलाबी रंगाची सुंदर अशी साडी परिधान केलेली होती. मुकेश अंबानी यांनीही यावेळी हजेरी लावली होती. 



 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दीपिका झाली ट्रोल?


दीपिकानं यावेळी हॉल्टर नेक आणि बेकलेस ब्लाऊज परिधान केला होता. त्यासोबत तिनं पांढरी शिअर साडी परिधान केलेली होती. यावेळी तिला अनेकांनी ट्रोलही केलं आहे तर अनेकांनी तिची स्तुतीही केली आहे. यावेळी तिनं कोकिलाबेन अंबानी आणि ईशा अंबानी यांचीही भेट घेतली. त्यामुळे तिच्या रिेअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.