Deepika Padukone Net Worth : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आज 37 वा वाढदिवस आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) सल्ल्यानंतर फराह खाननं (Farha Khan) 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ओम शांती ओम' (Om Shanti Om) चित्रपटात दीपिकाला कास्ट केलं. सध्या दीपिका ही तिचा आगामी चित्रपट 'पठाण'च्या (Pathaan) 'बेशरम रंग' (Besharam Rang) गाण्यासाठी परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आज दीपिकाची ब्रँड व्हॅल्यू 400 कोटी आहे आणि 366 कोटी एकूण संपत्ती असून ती कमाईच्या बाबतीत पती रणवीर सिंगलाही मागे टाकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पदुकोण (Deepika Padukone Net Worth) चित्रपट निर्मात्याची पहिली पसंती राहिली आहे. पण तिची फी एकूण प्रत्येकजण दीपिकाला साइन करू शकत नाही.


एका चित्रपटाची फी? 


दीपिका पदुकोणच्या फीबद्दल 'टाइम्स ऑफ इंडिया' नं एक रिपोर्ट दिला आहे. त्यानुसार, दीपिका एका चित्रपटासाठी 15 ते 30 कोटी रुपये फी घेते. मात्र, ही फी दीपिकाच्या चित्रपटातील भूमिकेच्या मूल्यावरही बरीच अवलंबून असते.


दीपिकाची एकूण संपत्ती किती?


मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती ही 314 कोटी रुपये आहे. दीपिका ही एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे जिची एकूण संपत्ती 300 कोटींच्या पुढे आहे. दीपिका दरमहिन्याला 2 कोटींपेक्षा जास्त पैसे कमावते. तर कोणत्याही ब्रँड एन्डॉर्समेन्टसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी दीपिका 1.5 कोटी रुपये घेते. दीपिकाचा मुंबईत एक लग्झरीयस फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत जवळपास 16 कोटी असल्याचे म्हटले जाते. तर तिनं आणि रणवीरनं मिळून आणखी एक फ्लॅट विकत घेतला आहे. त्या फ्लॅटची किंमत ही 21 कोटी असल्याचे म्हटले जाते. दीपिकाच्या कार कलेक्शनमध्ये Audi, Mercedes आणि Rang Rover सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत. तर दुसरीकडे तिचा पती रणवीर सिंहची (Ranveer Singh) एकूण संपत्ती ही 271 कोटींच्या जवळपास आहे. त्यामुळे संपत्तीच्या बाबतीत दीपिका ही पती रणवीर सिंगला मागे टाकते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


2013 साली, दीपिका पदुकोणने व्हॅन ह्यूसेनच्या मजतीनं कपड्यांचे कलेक्शन लॉन्च केले. 2015 मध्ये दीपिकाने Myntra सोबत All About You कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला. याशिवाय दीपिका तनिष्क, टेटले ग्रीन टी आणि लॉरियल या ब्रँडसाठी दीपिका काम करते. दीपिकाने KA एंटरप्रायझेसच्या मदतीन आंतरराष्ट्रीय फूड सप्लायमध्ये स्थान निर्माण केले. एपिगामिया असे या ब्रँडचे नाव आहे. हा दही आणि फ्रोझन फूड मिळतात. याशिवाय दीपिका इलेक्ट्रिक टॅक्सी, ब्लू स्मार्टमधूनही कमाई करते. 2022 मध्ये, दीपिकानं 82 डिग्री ईस्ट या ब्रँड नावानं स्किनकेअर प्रोडक्ट सुरू केले