आलिया-रणबीरच्या लग्नावर दीपिकाची रिएक्शन व्हायरल
रणबीर-आलियाच्या लग्नावर सगळे सेलेब्सही आनंद व्यक्त करत आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर 14 एप्रिल म्हणजेच आज गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अशा परिस्थितीत कपूर कुटुंबात जल्लोषाचं वातावरण आहे. या भव्य लग्नाच्या खास फोटोंची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे, तर दुसरीकडे रणबीर-आलियाच्या लग्नाचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ लीक होऊ नये म्हणून गोपनीयतेची विशेष काळजी घेत आहे.
रणबीर-आलियाच्या लग्नावर सगळे सेलेब्सही आनंद व्यक्त करत आहेत. दरम्यान, आता रणबीरची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणने या लग्नावर अशी प्रतिक्रिया दिली आहे, जी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दीपिका पादुकोणची रिएक्शन
खरंतर, नुकतीच ब्रह्मास्त्र दिग्दर्शक अयान मुखर्जीने या चित्रपटाचं पहिलं गाणं, केसरीयाची पहिली झलक शेअर केली. केसरिया गाण्यासोबतच अयान मुखर्जींने एक पोस्ट शेअर करून रणबीर-आलियाच्या लग्नाची पुष्टी केली होती. या पोस्टवर सगळ्या सेलिब्रिटींनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या असून या यादीत दीपिका पदुकोणचंही नाव आहे. अयान मुखर्जीची ही पोस्ट दीपिकाने लाइक केली आहे.
दीपिकाने या पोस्टला लाईक केल्याच्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा आहे. यासोबतच दीपिकाची ही स्टाइल सगळ्यांनाच आवडत आहे. दीपिका आणि रणबीरचं नातं जगजाहीर आहे. त्याच बरोबर, ब्रेकअपनंतरही, रणबीर आणि दीपिका खूप चांगले मित्र आहेत.
एवढंच नाही तर रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट देखील दीपिकाची खूप चांगली मैत्रीण आहे. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण एकमेकांना खूप दिवस डेट करत होते. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही समोर आल्या होत्या, पण नंतर अचानक दोघंही वेगळे झाले.