मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने 14 - 15 नोव्हेंबरला आपल्या कुटुंबातील अगदी मोजक्या लोकांसोबत इटलीतील लेक कोमोमध्ये लग्न केलं. या दोघांनी इटलीत लग्न करण्याचा निर्णय का घेतला हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपवीरच्या चाहत्यांना पडलेला हा मोठा प्रश्न की, या दोघांनी लग्न करण्यासाठी इटलीची निवड का केली? याबाबत आता स्वतः दीपिका पदुकोणाने खुलासा केला आहे. 


लग्नानंतर एका मुलाखतीत दीपिका पदुकोणने याची माहिती दिली आहे. दीपिकाने filmfare ला एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये दीपिका पदुकोणने इटलीत का लग्न केलं याचं उत्तर दिलं. 


दीपिका आणि रणवीरचा उद्देश परदेशात लग्न करणं नव्हतं. फक्त या दोघांना आपला विवाह सोहळा हा अतिशय खाजगी ठेवायचा होता. याकरताच त्यांनी लग्नाकरता इटलीतील लेक कोमोची निवड केली. 


दीपिका म्हणाली की, लग्नातील आमची प्रायव्हसी ही अतिशय महत्वाची होती. कारण लग्नाच्या एक महिना अगोदर घोषणा केली होती त्यामुळे त्यातील प्रायव्हसी टिकून राहणं अत्यंत महत्वाची होती. 


या दोघांच्या लग्नात विधीनंतर हर्षदीप आणि शुभा मुदगल सारख्या मोठ्या गायकांनी आपला कार्यक्रम सादर केला. या दोघांच्या लग्नाला जवळपास 25 ते 30 करोड रुपये खर्च आला. लग्नाच्या अगोदरच या दोघांनी मुंबईतील जुहू परिसरात 50 करोड रुपयांच घर खरेदी केलं आहे. 


रणवीर आणि दीपिकाचं लग्न 2 पद्धतीने झालं. एक सिंधी आणि दुसरं कोंकणी पद्धतीने. या लग्नाला फक्त दीपिका आणि रणवीरच्या जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता. 


'पद्मावत' या चित्रपटात साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी त्याला स्टार स्क्रीन आवॉर्ड्सतर्फे यंदाचा सर्वत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारतेवेळी रणवीरने आपल्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दिग्दर्शक आणि मार्गदर्शक संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले. त्यासोबतच त्याने कार्यक्रमात उपस्थित आपली पत्नी, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचेही आभार मानले.