दीपिकाने शेअर केला आईचा मजेशीर व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये दीपिकाची आई अभिनय करताना दिसत आहे.
मुंबई : बॉलिवुड मस्तानी दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून तिच्या मेट गालातील बार्बी लुकमुळे चर्चेत आहे. नुकताच 'मदर्स डे'च्या निमित्ताने दीपिकाने तिच्या आईचा उज्ज्वला पदुकोण यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिकाची आई एका कुटुंबातील व्यक्तीचा अभिनय करताना दिसत आहे.
दीपिकाने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर आईचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला दीपिकाने 'तुम्ही पाहू शकता मझ्यात हे अभिनयाचे गुण कुठून मिळाले आहेत. मला हे गुण माझी मैत्रिण, मार्गदर्शक, अँकर, रोल मॉडलकडून मिळाले आहेत.' अशाप्रकारचं कॅप्शनही तिने व्हिडिओला दिलं आहे. दीपिकाने या पोस्टमध्ये तिच्या सासूलाही टॅग केलं आहे.
मेट गाला २०१९ मध्ये दीपिकाच्या बार्बी लुक सर्वांनाच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. मेट गालामधील ड्रेसमध्ये तयार झाल्यानंतर हॉटेलच्या लॉबीमध्ये ड्रेसमध्ये अडकून पडतानाचा दीपिकाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. मेट गालामध्ये तिसऱ्यांदा दीपिकाने सहभाग घेतला होता.
सध्या दीपिका तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.