Deepika Padukone Used To Stole From Hotels : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पठाण या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. चित्रपटातील दीपिकाच्या बोल्ड लूक आणि अभिनयानं ती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या दीपिका एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या एक अशी बातमी समोर आली आहे ज्यामुळे दीपिकाला चोरी करण्याची सवय असल्याचे समोर आली आहे. (Shahrukh Khan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाच्या या गोष्टीचा खुलासा हा दीपिकाची बेसट फ्रेण्ड स्नेहा रामचंद्रनं केला होता. फ्रेण्डशिप डेच्या निमित्तानं दीपिकानं तिच्या वेबसाइटवर एक नोट शेअर केली होती. ही नोट तिची बेस्ट फ्रेण्ड स्नेहा रामचंद्रनं शेअर केली होती. या नोटमध्ये असे लिहिले होते की, 'तुम्ही अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखता का? ज्याची उपस्थिती किंवा त्यानं मारलेली मीठी ही एका हॉट चॉकलेटसारखी उब देत असल्याचे भासते.' 



यावेळी दीपिकाच्या बेस्ट फ्रेण्डनं त्या नोटवर पुढे म्हटले होते की, 'ज्या व्यक्तीशी ती तानतास फोनवर बोलू शकेल आणि आनंदानं जगू शकेल. तुम्ही अशा कोणत्या व्यक्तीला ओळखता का जो तुमच्यासाठी चोरी करेल, म्हणजे हॉटेलमधून तुमच्यासाठी आवडते शॅम्प्यूच्या छोट्या बाटल्या गोळा करेल.'


वादाच्या भोवऱ्यात अडकला होता 'पठाण' 


दीपिका पदुकोण पठाण चित्रपटातील गाणं प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) या चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यात भगव्या बिकिनी परिधान करत बोल्ड डान्स केला होता. त्यावर अनेक धार्मिक संघटनांनी विरोध केला आणि चित्रपटावर निशाणा साधला आहे. त्यानंतर बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह काही भाजपा नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता. दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीसह गाण्यातील काही वाक्यांवरही आक्षेप घेण्यात आले होते. या आक्षेपानंतर ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने चित्रपट निर्मात्यांना काही बदल सुचवले. 


हेही वाचा : Rajesh Khanna यांना संपवायचं होतं या कारणामुळे जीवन; मोठं कारण समोर


इतकंच काय तर बॉयकॉट 'पठाण' देखील सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला होता. मात्र, चित्रपट पाहण्यासाठी गर्दी पाहता त्याचा काही परिणाम झाला नाही असे समोर आले आहे. या चित्रपटात शाहरुख भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. तर चित्रपटात दीपिका आणि जॉन अब्राहम  (John Abrahm) यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद आहे.