वयाच्या 18 व्या वर्षी बॉलिवूडच्या `या` टॉपच्या अभिनेत्रीला मिळाला होता अजब सल्ला... केला मोठा खुलासा
Deepika Padukone ...आणि असा सल्ला एका टॉप अभिनेत्रीला मिळाला होता, पण त्या अभिनेत्रीने तिच्या कामाने त्या दिग्दर्शकाला चोख प्रत्युत्तर दिले.
Deepika Padukone Plastic Surgery: बॉलिवूडमध्ये आपल्या दबदबा निर्माण करण्यासाठी आणि कायम चिरतरुण दिसण्यासाठी अनेक अभिनेत्रींनी आपली शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामध्ये नाव सांगता येईल श्रीदेवी (Sridevi), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), करिष्मा कपूर (Karishma Kapoor) यांनी...मात्र या इंडस्ट्रीत अशाही अभिनेत्री आहेत ज्या आज बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री आहे. अनेक चित्रपट दिग्दर्शक या अभिनेत्रीला प्लास्टिक सर्जरीचा सल्ला देतात आणि असा सल्ला एका टॉप अभिनेत्रीला मिळाला होता, पण त्या अभिनेत्रीने तिच्या कामाने त्या दिग्दर्शकाला चोख प्रत्युत्तर दिले. आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) बद्दल.
दीपिका मिळाला अजब सल्ला
दीपिकाने आपल्या आयुष्यातील त्या क्षणांबद्दल सांगितल्यावर चाहत्यांचे पायाखालची जमीन सरकली. दीपिका म्हणाली की, तिला वयाच्या 18 व्या वर्षी बॉडी सर्जरी (breast implant surgery) करण्याचा सल्ला देण्यात आला होता. फिल्म इंडस्ट्रीत (film industry) खूप काही शिकले, खूप काही सहनदेखील केलं. एकेकाळी तिला ब्रेस्ट इम्प्लांटचा (breast implants) सल्ला देण्यात आला होता. पण दीपिकाने हा सल्ला मानला नाही. (deepika padukone was advised breast surgery NM)
शाहरुखने दिला होता सल्ला...(Shahrukh also gave advice)
दीपिकाने अजून एक गौप्यस्फोट केला आहे. ती म्हणाली की, तिला शाहरुख खाननेही एक सल्ला दिला होता. किंग खानने तिला म्हणाला की, तू कायम अशा लोकांसोबत काम कर ज्यांना तू ओळखते. त्यांच्यासोबत काम करताना तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. यासोबतच तुम्ही त्यांच्यासोबत आठवणीही बनवाल. शाहरुखचा हा सल्ला तिच्यासाठी खूप उपयोगी ठरल्याचे दीपिका सांगते.
दीपिकाचा आगामी चित्रपट (Deepika's upcoming film)
दीपिका लवकरच 'पठाण' (Pathan) चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan), जॉन अब्राहम (John Abraham), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), हृतिक रोशन (Hrithik Roshan), आशुतोष राणा (Ashutosh Rana) असे अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत. दीपिका पदुकोणचा हा चित्रपट अॅक्शन-थ्रिलर चित्रपट (action-thriller film) आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित (released) होणार आहे.