मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या बंगलुरूमधील रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंनी चाहत्यांना खास आकर्षित केलं आहे. या कपलचे सगळे लूक फक्त आणि फक्त रॉयल होते. या दोघांच्या कपड्यांनी सगळ्यांना आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी भाग पाडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाने कोंकणी लग्नासाठी कांजीवरम साडी तर सिंधी लग्नासाठी लेहंगा घातला होता. तर बंगलुरू येथील रिसेप्शनकरता गोल्डन कांजीवरम साडी नेसली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या साडीची चाहत्यांमध्ये भरपूर क्रेझ दिसत आहे. एवढंच काय अशाच पद्धतीची साड्या दुकानात विकायला सुरूवात देखील झाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, अंगाडी गॅलेरियामधून दीपिकाची साडी घेतली आहे. आता या दुकानातील सर्व साड्या विकल्या गेल्या असल्याची माहिती आहे. साड्यांचा स्टॉक संपल्यानंतरही ग्राहक या साडीसाठी उत्सुक आहेत. 


सुत्रांच्या माहितीनुसार, दीपिकाची ही सिल्क गोल्डन साडी 2 ते 3 लाख रुपये आहे. या साडीला रॉयल टच मिळावा या करता मोत्यांचा हार आणि कपाळात सिंदूर भरलं असून केसांना टाइट बनमध्ये घातलं होतं. 


तर यावेळी रणवीर सिंह ब्लॅक आणि गोल्डन कॉम्बिनेशनच्या शेरवानीत होता. दीपवीरच्या या लूकवरून सोशल मीडियावर खूप चर्चा देखील झाली. दीपिका ट्रोल देखील करण्यात आलं. कारण तिचा आणि अनुष्काचा रिसेप्शनमधील लूक सारखाच असल्याचं म्हटलं गेलं. दीपिकाने अनुष्काला कॉपी केल्याची टीका चाहत्यांनी केली.