मुंबई : बॉलिवूड मस्तानी दीपिका पदुकोण कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चा असते. आता पुन्हा एकदा दीपिका चर्चेत आहे ते तिने केलेल्या विधानामुळे. राजकारणात स्वच्छ भारत अभियानाची मंत्री बनण्यास आवडेल असं तिनं सांगितलंय. स्वच्छता करणं मला आवडतं. राजकारणात स्वच्छ भारत मोहिमेसाठी काम करण्याची इच्छा असल्याचं तिने म्हटलंय. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला स्वच्छता करायला आवडतं. मी लहान असताना माझे मित्र-मैत्रिणी त्यांच्या घरी बोलवत. त्यांच्या घरातली त्यांची कपाटं मी लावून देत होती. हे काम करायला मला छान वाटायचं. मला घर स्वच्छ  निट लावलेलं आवडतं. त्यामुळे राजकारणात कधी संधी मिळाली तर स्वच्छता अभियानाची मंत्री बनण्यास मला खूप आवडेल अशी इच्छा तिने लोकमत महाराष्ट्रीन ऑफ द इयर या पुरस्कार वितरण सोहळादरम्यान ती बोलत होती. 


दीपिका आणि रणवीर  यांच्या लग्नानंतर रणवीरच्या आलेल्या 'सिंबा' आणि 'गली बॉय' दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली. रणवीरने साकारलेल्या दोनही भूमिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. परंतु लग्नानंतर ही रिअल लाईफ जोडी रिल लाईफमध्येही पती-पत्नीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. क्रिकेटर कपिल देव यांच्या जीवनावर आधारित '83' चित्रपटात रणवीर सिंह कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकराणार आहे. तर कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका दीपिका साकारणार असल्याची चर्चा आहे. परंतु यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती सांगण्यात आली नाही. त्यामुळे आता ही रिअल लाईफ सुपरहिट जोडी रिल पडद्यावरही कमाल करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.