नवी दिल्ली : दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम यांची भेट एका टी.व्ही. मालिकेमुळे झाली. मग ओळखीचे रुपांतर मैत्री आणि मग असा हा प्रवास घडत गेला. आता त्यांच्या नात्याला लग्नामुळे पूर्णत्व प्राप्त होणार आहे. त्यांचा लग्नसोहळा सुरू असून तो कोणत्याही बॉलिवूड कलाकारांच्या लग्नापेक्षा कमी नाही. त्याच्या विविध विधींचे म्हणजे मेंहदी, संगीत, हळदीचे व्हिडिओज समोर येत आहे. त्यात त्यांची मस्ती, नाच पाहायला मिळत आहे. यापूर्वी त्यांचे प्री-वेडिंग फोटोज व्हायलर झाले होते.


चाहते उत्सुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका आणि शोएबच्या चाहत्यांनी त्यांच्या जोडीला शोएका असे नाव दिले असून ते फार प्रसिद्ध झाले आहे. या जोडीच्या लग्नाचे, विविध विधींचे व्हिडिओज, फोटोज पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.


पहा व्हिडिओज...


 










येथे होणार लग्न


दीपिका-शोएबचे लग्न २६ फेब्रुवारीला होणार आहे. लग्न भोपाळ येथील गृहनगर येथे शोएबच्या घरी असल्याने दोघेही लग्नासाठी भोपाळला रवाना झाले आहेत. 


लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण


दीपिका कक्कड लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. जे.पी. दत्ता यांच्या पलटन सिनेमात ती झळकणार आहे. याची घोषणा दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.