मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ आहे. मुंबई आणि दिल्लीत कोरोना रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे देशा समोरील अडचणींमध्ये वाढ होत असताना दिसत आहे. तर दुसरीकडे सामान्य जनतेपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच जण सरकारकडे मदतीची मागणी करताना दिसत आहेत. दरम्यान टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंहने (Deepika Singh) एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आईला कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांच्याकडे मदतीची मागणी करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, 'माझी आई ५९ वर्षांची आहे. सध्या ती दिल्लीमध्ये आहे. माझे वडील देखील तिच्यासोबत आहेत. माझ्या आईची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु अद्यापही आमच्या हातात रिपोर्ट लागलेले नाही. माझे वडील रुग्णालयात गेले होते. पण डॉक्टरांनी रिपोर्टचे फोटो काढून घेण्यास सांगितले. माझ्या वडिलांकडे Whats App नाही. ' अशा सर्व संकटाच्या प्रसंगात दीपिका अडकली आहे. 



ती पुढे म्हणाली, 'मी सध्या मुंबईत आहे. परंतु मी सद्य स्थितीत दिल्लीला नाही जावू शकत. त्यामुळे सरकारने माझी मदत करावी.' अशा आशयाचं ट्विट अभिनेत्रीने केले आहे. अभिनेत्रीचं दिल्लीत एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे लवकरात लवकर तिच्या व्हिडिओची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. 


दरम्यान, गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे. देशात सध्या कोरोना संसर्गाची ३,०८,९९३ प्रकरणे नोंदली गेली आहेत.  दिल्लीत कोरोना रूग्णांची एकूण संख्या ३६८२४ वर गेली आहे. २२२१२ लोकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. १३३९८ लोक बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत १२१४ लोकांचा मृत्यू झाला आहे.