मुंबई : अमेरिकेत सुरुवातीचे दिवस राहून भारतात परतलेल्या दीप्ती नवल यांना 1978 मध्ये पहिला बॉलिवूड सिनेमा मिळाला. दीप्ती यांचा पहिला सिनेमा हिट ठरला आणि त्यानंतर त्यांच्या हिट सिनेमांचा टप्पा सुरू झाला. बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या दीप्ती नवल यांनी बरीच वर्षे एकामागून एक हिट सिनेमा दिले. त्यांची तुलना स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्याशी केली गेली. त्यावेळच्या या तिन अभिनेत्री सर्वात महाग आणि लोकप्रिय अभिनेत्री मानल्या जात असत. नजर टाकुया त्यांच्या सर्वाधिक रेटिंग्स बरोबरच 10 चित्रपट जे लोकांना अजुनही पहायला आवडतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या चित्रपटापासून हिट ठरल्या दीप्ती
श्याम बेनेगल यांच्या सोबतचा दीप्ती नवल यांचा पहिला सिनेमा 1978मध्ये रिलीज झाला आणि हा सिनेमा हिट ठरला. सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे दीप्ती लोकप्रिय झाल्या. त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो ही हिट झाला. 1981 मध्ये जेव्हा दीप्ती नवल आणि फारूख शेख ही जोडी 'चश्मेबद्दूर' मधून स्क्रीनवर दिसली तेव्हा यशाच्या सगळ्या नोंदी तुटल्या.


शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्याशी तुलना
दीप्ती नवल यांनी अमोल पालेकर, फारुख शेख, उत्पल दत्त, रिषिकेश मुखर्जी आणि शबाना आझमी यांच्यासोबत खूप काम केलं. यावेळी त्यांची तुलना स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्याशी केली गेली. त्यावेळी या तिन्ही अभिनेत्री सर्वात लोकप्रिय होत्या. चश्मेबद्दूर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही फारूक शेख आणि दीप्ती नवल यांना कास्ट करण्यासाठी दिग्दर्शक-निर्मात्यांची रांग लागली होती.



बॉलीवूडवर राज्य करणारी अभिनेत्री
दीप्ती नवल आणि फारूक शेख या जोडीने बॉलिवूडवर जवळपास एक दशक राज्य केलं. जवळपास सलग हिट चित्रपट यांचे आले होते. तसंच या दोघांच्य़ा अफेअर्सच्या चर्चाही होत होत्या. दीप्ती नवल यांनी 1985 मध्ये चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासोबत लग्न केलं. 2002 मध्ये हे दोघे वेगळे झाले. दीप्ती नवल डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेली वेबसीरीज 'क्रिमिनल जस्टिस'मध्ये दिसल्या होत्या


टॉप १० हाईएस्‍ट रेटेड सिनेमा
1- 'जूनून' - 1978- 7.6/10 IMDb
2- 'चिरुथा' - 1981-8.6/10 IMDb
3- 'चश्‍मेबद्दूर' - 1981- 8.0/10 IMDb
4- 'साथ साथ' - 1982- 7.1/10 IMDb
5- 'कथा' Katha - 7.8/10 IMDb
6- 'किसी से न कहना' - 1983, 7.4/10 IMDb
7- 'रंग बिरंगी' - 1983- 7.2/10 IMDb
8- 'कमला' - 1985- 7.2/10 IMDb
9- 'अनकही' - 1985- 7.2/10 IMDb
10- 'दामुल' - 1985- 6.8/10