मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये दिसली श्रीदेवी, डिझायनरने शेअर केला शेवटचा PHOTO
अभिनेत्री श्रीदेवीने दुबईत लग्नसोहळ्यात सहभागी झाली. या लग्नसोहळ्यात श्रीदेवी नाच-गाण्यात सहभागी झाली मात्र, या लग्नसोहळ्यानंतर कार्डिअॅक अरेस्टने वयाच्या ५४व्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं.
नवी दिल्ली : अभिनेत्री श्रीदेवीने दुबईत लग्नसोहळ्यात सहभागी झाली. या लग्नसोहळ्यात श्रीदेवी नाच-गाण्यात सहभागी झाली मात्र, या लग्नसोहळ्यानंतर कार्डिअॅक अरेस्टने वयाच्या ५४व्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं.
लग्नसोहळ्यासाठी श्रीदेवी दुबईत
बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या विवाहासाठी श्रीदेवी दुबईत होत्या. दुबईत झालेल्या लग्नसोहळ्यात श्रीदेवीसोबत आपला जवळचा मित्र आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा तसेच करण जोहरही उपस्थित होते.
अनेक दिग्गज कलाकारांची विवाहसोहळ्याला उपस्थिती
बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.
या लग्नसोहळ्यात अभिनेत्री श्रीदेवी आणि मुलगी खुशी कपूर यांनी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले ड्रेस परिधान केले होते. मनीष मल्होत्रा हा श्रीदेवीचा जवळील मित्र होता आणि त्याने डिझाइन केलेल्या ड्रेसेसमध्ये श्रीदेवी अनेकदा पहायला मिळत असे. या लग्नसोहळ्यातही श्रीदेवीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
मनीष मल्होत्राने शेअर केला फोटो
लग्नसोहळ्यात मनीष मल्होत्राने श्रीदेवीसोबत एक फोटोही क्लिक केला. हा फोटोही मनीष मल्होत्राने शेअर केला. मनीष मल्होत्राने फोटो शेअर करताना म्हटलं की, " ४ दिवसांपूर्वी माझ्यासोबत घेतलेला हा शेवटचा फोटो आहे..."
१९६३ मध्ये जन्मलेल्या श्रीदेवी यांनी १९६७ साली एक बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. श्रीदेवीने हिंदीसोबतच तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम सिनेमांतही काम केलं आहे. श्रीदेवीला २०१३ साली सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले.