Devara Part-1 Box Office Collection: 'देवरा' चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला आहे. 6 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जूनियर एनटीआर या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी आला आहे. तेलुगू सुपरस्टार जूनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. 'देवरा' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान,  'देवरा' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी थिएटरमध्ये चांगली जादू दाखवली आहे. 


 'देवरा' चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई


 'देवरा' चित्रपट 27 सप्टेंबरपासून जगभरात प्रदर्शित झाला आहे. अॅक्शनने भरलेल्या या चित्रपटाची कथा सस्पेन्सने भरलेली आहे.  'देवरा' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अंदाज बांधले जात होते. मात्र, त्या आधारावर आता हा चित्रपट पूर्णपणे अपेक्षा आणि अंदाजावर खरा उतरताना दिसत आहे. रिपोर्टनुसार,  'देवरा' चित्रपटाने पहिल्या दिवशी 77 कोटींची बंपर कमाई केली आहे. 


 'देवरा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचा हा आकडा सर्व भाषांचा समावेश करणारा आहे. मात्र, हे आकडे बदलतील अशी सर्वांची अपेक्षा आहे. पण 6 वर्षांनंतर जूनियर एनटीआरच्या  'देवरा' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात मानली जात आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कसा आहे  'देवरा' चित्रपट? 


पहिल्याच दिवशी  'देवरा' चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरबाहेर प्रचंड गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत आहे. ज्याप्रमाणे 'बाहुबली' चित्रपटामध्ये कट्टप्पाने बाहुबलीला का मारले यावर सस्पेन्स होता. तसाच काहीसा सस्पेन्स  'देवरा' या चित्रपटात पाहायला मिळत आहे. पण चित्रपटात कोणाचा मृत्यू होतो? यासाठी तुम्हाला  'देवरा' चित्रपट बघावा लागेल. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सैफ अली खानने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.