मुंबई : हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधारी यांना घेण्यासाठी आंदोलन करणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान त्याचबरोबर महिलांचे प्रश्न या सगळ्या संदर्भात विरोधक आज पायऱ्यांवर आंदोलन करणार आहेत यावेळी बोलताना मराठी सिनेमांना सिनेमागृह  मिळत नसल्याचा दावा मांडण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता प्रसाद खांडेकरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचा पाठिंबा 
विधान परिषदेमध्ये चर्चा सुरु असताना प्रविण दरेकर यांनी चित्रपटाबद्दल महत्वाचा मुद्दा मांडला आहे. यावेळी भाजपचे आमदार प्रविण दरेकर बोलताना म्हणाले, सभापदी मोहोदय, बोरोवलीमध्ये अभिनेता प्रसाद खांडेकर नावाचा एक अभिनेता आहे. जो हास्यजत्रेतून संपुर्ण महाराष्ट्राला लोकप्रिय आहे. त्याचा ८ डिसेंबरला एकदा येऊन तर बघा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण काही सिनेमातील बॉस लोक आहेत दादा लोकं. ते या मराठी सिनेमांना सिनेमागृह मिळून देत नाहीत. माझी विनंती आहे. हा प्रसाद खांडेकर मराठी तरुण अभिनेता आहे. सर्व सामान्य कुटूंबातला आहे. तर या मराठी चित्रपटाला तात्काळ सिनेमागृह उपलब्ध होण्या संबधात माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. याकडे लक्ष घालून  सहकार्य व्हावं अशाप्रकारचं आवाहन मी करतो अशी माझी विनंती आहे. 


त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनी प्रसाद खांडेकरांच्या अभिनय कौशल्याचं कौतुक केलं. शिवाय अशा गुणी कलाकरांच्या चित्रपटासाठी चित्रपटगृह मिळत नसेल तर वेळ पडल्यास कायदेशीर कारवाई करु असं आश्वासन विधान परिषदेत दिलं.या मुद्यावर पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस म्हणाले, सभापती मोहदय, प्रसाद खांडेकर अतिशय गुणी अभिनेता आहे. आणि हास्यजत्रेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सातत्यांनी त्यांनी प्रचंड लोकांच्या मनावर पकड त्यांनी धरलेली आहे. जर अशा मराठी सिनेमांना त्याठिकाणी थिएटर मिळत नसतील तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाईदेखील केली जाईल. पण ते थिएटर उपलब्ध केले जातील.



या सिनेमात गिरीश कुलकर्णी,तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने फुलंब्रीकर कुटुंबात पहायला मिळणार आहेत. या पाच जणांसोबत सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आणखी अनेक कलाकारांची भली मोठी फौज चित्रपटात  आहे. हा सिनेमा येत्या ८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.