मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील कलाकार मंडळी जेव्हा एखाद्या मालिकेचं शुट करत असतात. तेव्हा त्यांना आपला सगळा वेळ हा शुटींग पुर्ण करण्यासाठी द्यावा लागतो. आपल्या डेली शेड्युलमधील 12 ते 14 तासांहून अधिक वेळ ते सेटवरच घालवत असतात. त्यामुळे ऑफ स्क्रिन इतर कलाकारांसोबत त्यांची बॉण्डिंग ही अजूनच घट्ट होतं जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या देवमाणूस या मालिकेच्या सेटवर देखील असंच काहीस चित्र पाहायला मिळालं. देवमाणूस ही मालिका सध्या प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करतेयं.. त्यात या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. या मालिकेतील एक दमदार पात्र म्हणजे डिंपल... डिंपलच्या अवखळपणाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.



 प्रेक्षकांसह मालिकेतील कलाकारांना आपलंस करणाऱ्या या डिंपलचा नुकताच सेटवर वाढदिवस साजरा करण्यात आलाये. डिंपलचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी सगळ्या कलाकारांनी चांगलीच मेहनत घेतल्याचं दिसून आलं.


डिंपल अर्थात अभिनेत्री अस्मिता देशमुखचा वाढदिवस आणखीनंच खास करण्यासाठी कलाकारांनी एकत्र जमतं तिला 1-2 नव्हे तर 3 वेगवेगळ्या केक कट करायला सांगितले..त्यामुळे ती देखील चांगलीच सरप्राईज झाली होती, 'डिंपल को सिंपल मत समझो' हे तिने प्रेक्षकांना दाखवून दिलंच आहे, त्यामुळे वेळोवेळी तिच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळतं असते.





अस्मिता मुळची पुण्याची आहे. देवमाणूस ही तिची पहिलीच मालिका आहे. मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या डॉक्टर पासून ते अगदी बालकलाकार टोण्यापर्यंत सगळेच सोशल मीडियावर देखील चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यात डिंपलने देखील सोशल मीडियावर आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.