मुंबई : 'देवों के देव महादेव'मध्ये पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनारिका भदोरिया हिने धक्कादायक खुलासा केला आहे. सोनारिकाने सांगितले की, तिने एका सीरियलमध्ये काम केले होते आणि तिची फी अद्याप मिळालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे प्रकरण 2018 मधील आहे. इतकंच नाही तर सीरियलशी संबंधित इतर कलाकार आणि क्रूचे पैसेही अडकले आहेत, असं बोललं जात आहे. आता तिची इच्छा आहे की तिचे पैसे लवकरात लवकर मिळावेत. ती म्हणतो की, तिच्या करिअरमधील तो सर्वात वाईट काळ होता. आधी कोरोनाचा फटका आणि नंतर पैसे न भरल्याने अडचणी वाढल्या आहेत.


सोनारिका शेवटची 'इश्क में मरजावां' या मालिकेत दिसली होती. ती बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यावरुन गायब आहे. एका मुलाखतीत सोनारिकाने सांगितले की, तिने 'दास्तान-ए-मोहब्बत: सलीम अनारकली' ही टीव्ही मालिका केली होती.


यामध्ये काम करण्यासाठी तिला जे मानधन मिळणार होतं ते तिला मिळालेलं नाही. तिची सुमारे 70 लाख रुपये अडकले आहेत. सोनारिका म्हणाली, 'तीन वर्षे झाली आणि मला अजूनही माझे पैसे मिळालेले नाहीत. या शोमध्ये माझ्याशिवाय इतर कलाकार आणि तंत्रज्ञांना पैसे मिळालेले नाहीत.



प्रथम कोविड-19 च्या पहिल्या लाटेचा आपल्यावर परिणाम झाला आणि नंतर पैसे न मिळाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.