लग्नाआधी Devoleena - विशालचा साखरपुडा? फोटोमुळे मोठं गुपित समोर
Devoleena Bhattacharjee आणि विशालचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.
Devoleena Bhattacharjee Got Engaged to Vishal Singh Before Marriage : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाची चर्चा सुरु असताना साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya) मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकली. देवोलीनाच्या मेहंदी, हळदीनंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल झाले. देवोलिनानं तिच्या जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत (Shanawaz Shaikh ) सप्तपदी घेतल्या आहेत. तिच्या लग्नानंतर सगळ्यांना धक्का बसला होता. त्यामुळे अनेकांनी देवोलीनाला प्रचंड ट्रोल केलं होतं. दरम्यान, लग्नाआधी देवोलीनाचा सहकलाकारा विशाल सिंहसोबत साखरपुडा झाला होता. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे सगळं खोटं असल्याचं समोर आलं.
देवोलीनानं गेल्या वर्षी 2022 मध्ये फ्रेब्रुवारी महिन्यात मालिकेतील तिचा ऑनस्क्रीन दीर विशाल सिंगसोबत रोमॅंटिक फोटो शेअर केला होता. यामध्ये विशाल सिंह देवोलीनासमोर गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसला होता. तसेच, दुसऱ्या एका फोटोत विशाल आणि देवोलिना मिठी मारत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये देवोलीनान लिहिले की, 'हे अधिकृत आहे'. त्यानंतर त्या दोघांनी एकत्र वेळ व्यथित केला. या दोघांच्या या फोटोनंतर त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आणि त्यांना उत्सुकता लागली होती.
देवोलीनाच्या या घोषणेनंतर दोघांचे चाहते आनंदी झाले होते. दरम्यान, साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी देवोलीनानं साखरपुड्याच्या बातमी विषयी चाहत्यांना सत्य सांगितलं. साखरपुड्याचा हा व्हिडीओ खरा नसून हा एक प्रमोशनल व्हिडीओ होता. याशिवाय एकदा एका मुलाखतीत देवोलीना बोलता बोलता शहनवाजविषयी बोलली होती. मात्र, यावेळी देवोलीनानं शाहनवाजचं नाव घेतलं नाही.
देवोलीनाने सांगितले की, 'मी एका मुलाला डेट करत आहे आणि तो या इंडस्ट्रीचा नाही पण मुंबईत राहतो. मला माझे खासगी आयुष्य खासगीच ठेवायचे आहे. मी लवकरच सगळ्यांना याविषयी सांगेन. दरम्यान, देवोलीनानं तिच्या लग्नाची माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली होती. अनेकांनी देवोलीनानं एका मुस्लिमसोबत लग्न केल्यामुळे ट्रोल केले होते.
हेही वाचा : आयुष्याचा लढा अजून संपलेला नाही! आधी कर्करोग आता 'या' भयानक आजाराशी लोकप्रिय Actress देतेय झुंज
रिपोर्ट्सनुसार, देवोलिना 2019 शाहनवाजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या सगळ्यात जेव्हा देवोलीनानं शहनवाजशी लग्न केलं तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झालं. तिनं अचानक लग्न केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. त्या लग्नाची तयारी सुरु असताना काही लोकांना वाटले की हा प्रॅंक आहे. तर काहींना वाटलं की 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील तिचा सहकलाकार विशाल सिंगसोबत लग्न बंधनात अडकणार आहेत
देवोलीनानं या 'साथ निभाना साथीया' मालिकेत गोपीची भूमिका साकारली होती. नंतर, अभिनेत्रीनं 'लाल इश्क' सारख्या शो आणि 'साथ निभाना साथिया'च्या दुसऱ्या सीझनमध्ये काम केले. देवोलीना 2019 मध्ये प्रसारित झालेल्या 'बिग बॉस 13' चा देखील एक भाग होती. देवोलिना सगळ्यात शेवटची 'बिग बॉस 15' मध्ये दिसली होती.