नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये 'रईस' चित्रपटातून पदार्पण करणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर 'यापेक्षा काही वाईट होऊ शकत नाही. पाकिस्तान जिंदाबाद' असं ट्विट केलं आहे. पाकिस्तानी लेखिका आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांची नात फातिमा भुट्टोने केलेल्या ट्विटवर तिने रिट्विट केलं आहे. माहिराने केलेल्या रिट्विटनंतर तिच्यावर टीका केली जात आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत छोटी बहू साकारणाऱ्या देवोलीना भट्टाचार्जीने माहिराला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवोलीना भट्टाचार्जीने माहिराच्या ट्विटवर 'जर कोणी कुप्रसिद्ध असेल आणि दहशतवादविरूद्धच्या लढाईवर टीका करत असेल तर मग ते सर्वात वाईट असेल. देशाप्रती असलेलं प्रेम आम्हाला आंधळं बनवतं, दहशतवाद नाही' असं उत्तर तिने दिलं आहे. 



 




 



माहिराव्यतिरिक्त 'सनम तेरी कसम' या बॉलिवूड चित्रपटाती अभिनेत्री मावरा हॉकेननेही पाकिस्तान जिंदाबाद म्हणत ट्विट केलं आहे. 




अनेक पाकिस्तानी कलाकरांनी भारतीय चित्रपटात काम केलं आहे. भारतातूनच पाकिस्तानच्या कलाकारांना मोठी ओळखही मिळाली. परंंतु जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मदने केलेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या भ्याड पुलवामा हल्ल्याचा निषेध करत भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे.