Sonarika Bhadoria : 'देवों के देव महादेव' या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनारिका भदोरियाच्या लग्नाचा कार्यक्रम सुरु झाला आहे. तिनं तिच्या मेहंदीसाठी आईची लग्नातील लेहेंगा परिधान केला आहे. लाल आणि हिरव्या रंगायाचा लेहेंग्यात असलेल्या सोनारिकानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहेत. त्यासोबत लग्नाच्या आधी सुंदर दिसण्यासाठी सोनारिकानं आयव्ही ड्रिप लावल्याचे देखील पाहायला मिळाले. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनारिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सोनारिकानं तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमाते फोटो शेअर केले आहेत. तर सोनारिकाचा होणारा नवरा विकासनं पिवळ्या रंगाचा वर्क असलेला सिल्क कुर्ता पायजमान सेट परिधान केला आहे. हे फोटो शेअर करत सोनारिकानं कॅप्शनमध्ये गाणं दिलं आहे की 'मेहंदी है रचनेवाली, हाथों में गहरी लाली।' तर पुढे सोनारिका म्हणाली 'आईचा लग्नातील लेहेंगा.' सोनारिकानं तिच्या आईच्या लग्नातील लेहेंगा परिधान करत तो लूक पुन्हा कॅरी केला आहे. मात्र, इतरांप्रमाणे तिनं आईची साडी किंवा लेहेंगा हा लग्नात नेसला नसून मेहंदीच्या कार्यक्रमात परिधान केला आहे. सोनारिकानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं आईचा लाल आणि हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. सोनारिकाच्या मेहंदीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कारण तिनं एक वेगळी डिझाइन निवडली आहे. सोनारिकाची मेहंदी जिथे तिच्या उजव्या हातावर 'शिव-पार्वती' यांची प्रतिमा काढली आहे. तर डाव्या हातावर नवरा-नवरीची प्रतिमा काढण्यात आली आहे. 



दरम्यान, याशिवाय सोनारिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत ती मेकअप करत असल्याचे पाहायला मिळते. तर सोनारिकानं तिच्या हातावर ड्रिप देखील लावल्याचे दिसत आहे. मात्र, ते पाहून तुम्हाला वाटत असेल की सोनारिकाला काही झालंय वगैरे पण ती ठीक आहे. खरंतर लग्नाआधी सोनारिका इंटरावेनस थेरेपी घेतेय. आयव्ही ड्रीप तुमच्या शरीराला गरजेचे असणारे न्यूट्रिएंट्स देते. त्यामुळे बॉडी ग्लो करते आणि त्यासाठीच सेलिब्रिटी याचा वापर करतात. 


हेही वाचा : विमान अपघातातून बचावली रश्मिका मंदाना! फोटो शेअर करत केला खुलासा


सोनारिका ज्याच्याशी लग्न बंधनात अडकते त्याचं नाव विकास आहे. विकास एक बिझनेसमॅन आहे. ते दोघं गेल्या 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 2022 मध्ये सोनारिकाला विजयनं लग्नासाठी विचारलं. त्यानंतर गोव्यात त्यांचा रोका झाला. आता ते लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.