मुंबई : 'धडक' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री जान्हवी कपूर हिने पाहता पाहता या झगमगत्या विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. सेलिब्रिटी कुटुंबातील असल्यामुळे अर्थातच तिच्यावर अपेक्षांचं ओझं होतं. पण, तेसुद्धा मोठ्या जबाबदारीने पेलत तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या  दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची ही लेक चर्चेत आहे ते म्हणजे सोशल मीडियावरील एका व्हिडिओमुळे. या व्हि़डिओमध्ये ती आपल्या एका अशा निर्णयाविषयी सांगत आहे, ज्यामुळे वडील बोनी कपूर तिच्यावर नाराज होऊ शकतात.


आपल्यला मुलीला पावलोपावली साथ देणारे पापा बोनी यावेळी तिला रागे भरण्याची शक्यता आहे; असं खुद्द जान्हवीच म्हणत आहे कारण, तिने नवा हेअरकट करत एका फोटोशूटसाठी हा सारा खटाटोप केला आहे. 


नव्या वर्षातील अर्थात जानेवारी महिन्यातील 'कॉस्मोपॉलिटन' या मासिकाच्या मुखपृष्ठावर जान्हवी झळकत असून याच मासिकाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन याविषयीची माहिती देण्यात आली. सोबतच एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला, ज्यामध्ये या नव्या लूकबद्दल जान्हवी माहिती देत असून, 'यासाठी बाबा मला मारतील', अशी भीतीही तिने व्यक्त केली. तेव्हा आता बोनी कपूर खरंच तिला रागे भरतात का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 




'तख्त' या आगामी चित्रपचटाच्या तयारीमध्ये व्यग्र असणारी जान्हवी यापूर्वी 'ब्राइड्स टुडे', 'वोग इंडिया', 'ग्रॅझिया' या मासिकांच्या मुखपृष्ठावरही झळकली होती. पण, 'कॉस्मोपॉलिटन'च्या मुखपृष्ठावर असणारा तिचा शॉर्ट हेअर लूक हा जास्तच चर्चेचा विषय ठरत आहे.