धडकच्या नव्या गाण्यात ईशान-जान्हवीचा रोमांटिक अंदाज...
जान्हवी कपूर धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे.
मुंबई : दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. या सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ट्रेलर प्रदर्शनानंतर सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. या सिनेमात जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. मराठी सुपरहिट सिनेमा सैराटचा हा रिमेक आहे. ज्यात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर प्रमुख भूमिकेत होते. धर्मा प्रॉडक्शन निर्मित धडक सिनेमाचे टायटल ट्रक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
धडक है न असे या गाण्याचे बोल असून या गाण्याचे संगीत अजय-अतूलने दिले आहे. मराठीमधील ही संगीतकाराची ही सुपरहीट जोडी आहे. सैराटची सर्व गाणीही अजय-अतुलनेच संगीतबद्ध केली होती. धडकचे हे गाणे अजय गोगावले, श्रेया घोषाल आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गायले आहे.
धडक सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे. हा सिनेमा २० जुलैला प्रदर्शित होणार आहे.