मुंबई : 2018ची सुरूवातच अनेक राडेबाज घटनांनी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय लीला भंसाळींच्या 'पद्मावती' या चित्रपटाला वाढता विरोध पाहता त्यामध्ये बदल सुचवण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या नावात बदल केल्यानंतर 'पद्मावत' या नावाने 25 जानेवारीला चित्रपट रीलिज होणार आहे.  


अनेक चित्रपटांच्या रिलिज डेट बदलल्या  


'पद्मावत' च्या रिलीज डेटमध्ये बदल झाल्याने बॉक्सऑफिसवरील टक्कर टाळण्यासाठी 'पॅडमॅन', 'वीरा दे वेडींग','परी','अय्यारी' यांच्या रीलिज डेटमध्ये बदल करण्यात आले आहेत.  


आता या चित्रपटांमध्ये 'धडक' या चित्रपटाचाही समावेश करण्यात आला आहे.  


 



 


कधी होणार धडक रिलीज  ? 


जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर प्रमुख  भूमिकेत असलेला 'धडक' हा सिनेमा मराठीतील मागील वर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'सैराट'चा हिंदी रिमेक आहे. 


धडक हा चित्रपट पूर्वी 6 जुलै रोजी रिलीज होणार होता. मात्र आता  हा चित्रपट 20 जुलैला रिलीज होणार आहे.  ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श ने ट्वीट करून या चित्रपटाचे नवे पोस्टर चाहत्यांसमोर आणले आहे.   



नवं पोस्टर  


धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टुडिओजचा भाग असलेला ' धडक' या सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यामध्ये रोमॅन्टिक अंदाजात मीठी मारताना त्यांचा फोटो पोस्टरवर खूपच खास दिसत आहे. शशांक खैतान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.