मुंबई : दोन स्टार किड्स म्हणजे जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर करण जोहरच्या धडक या सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात करतात. आता ही जोडी आता प्रमोशनात बिझी आहेत. जयपूर ते मुंबईपर्यंत सगळीकडे प्रमोशनसाठी फिरत आहेत. मुंबईत प्रमोशन दरम्यान जान्हवीला पाहून फॅन्सच्या काही गोष्टी ईशानला खटकल्या. आणि या गोष्टींनी जान्हवी देखील थोडी घाबरली अशावेळी ईशान तिच्यासाठी बॉडीगार्ड झाला. आणि त्याने सगळ्यांपासून तिला सावध केलं. 


जान्हवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये ती भरपूर घाबरलेली दिसली. तेव्हा ईशान अगदी सगळ्यांपासून वाचवत बाहेर घेऊन गेला. आणि त्याने तिला गाडीपर्यंत सोडलं. रिपोर्टनुसार, जान्हवी आणि ईशान दोघेही जुहूच्या मल्टीप्लेक्स जवळ गेले होते. प्रमोशन नंतर हा सगळा प्रकार घडला.