Dharmaveer 2 Balasaheb Thackeray and Anand Dighe : काही दिवसांपूर्वीच 'धर्मवीर 2' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटासाठी खूप उस्तुकता होती. त्याचं कारण म्हणजे 'धर्मवीर' या चित्रपट होता. कारण हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या. इतकंच नाही तर त्यांनी यासाठी कोणती समाजकार्य केली ते देखील दाखवण्यात आलं. येत्या 27 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशात चित्रपटाची संपूर्ण टीम ही प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्तानं त्यांनी नुकतीच 'झी24 तास'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोन आला तर त्यांच्याशी काय बोलतील याविषयी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलाखतीत विचारण्यात आलं की "अचानक आनंद दिघे किंवा बाळासाहेब ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी विचारलं की काय रे, महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरु आहे? तर तुम्ही काय सांगाल... त्यावर उत्तर देत प्रसाद ओक म्हणाला, मी दोघांनाही एकच सांगेन की परत या. कृपया परत या बस."


मंगेश देसाई म्हणाले, "हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या हेतूनं शिवसेना उभी केली होती. तो हेतू आणि त्यानंतर आनंद दिघे साहेबांनी ज्या हेतूनं ती पुढे वाढवली, तो हेतू. दोन्ही हेतू पुन्हा एकदा साध्य करण्यासाठी तुम्ही परत या. हेच मी म्हणणार. मला असंच म्हणावं लागेल की तुम्ही तरी या किंवा तुमच्यासारखे माणसं निर्माण करा."


याच प्रश्नावर उत्तर देत प्रवीण तरडे म्हणाले, "मला जर बाळासाहेब किंवा धर्मविरांचा फोन आला. तर मी त्यांना एवढंच म्हणेन की तुम्ही आता या आणि तुमच्या विचारसरणीला पोषक काय आहे. त्याच्याबाजूनं उभे राहा."



दरम्यान, 'धर्मवीर 2' या चित्रपटाविषयी बोलायाचे झाले तर या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे उमेश कुमार बन्सल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. प्रसाद ओक, क्षितीश दाते यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.