मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेता सलमान खान याच्यासोबतच आणखी एक अभिनेता मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. हा अभिनेता म्हणजे अभय देओल. ज्येष्ट अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा पुतण्या आणि सनी- बॉबी देओल यांचा चुलत भाऊ, अभय लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 46 व्या वर्षीही अभयनं लग्न केलेलं नाही. पण, आता मात्र त्यानं केलेल्या एका वक्तव्यामुळं देओल कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघड्यांचे सूर ऐकू येणार असल्याची चिन्हं आहेत. (Abhay Deol Confirms )


अभयच्या लग्नाच्या अफवा आजवर अनेकदा उठल्या. पण, त्यानं कधीच या अफवांवर प्रतिक्रिया दिली नाही. आता मात्र तो या मुद्द्यावर बोलू लागला आहे. हल्लीच माध्यमांशी संवाद साधताना त्याने ही गोड बातमी देत आपण लग्न करत असल्याच्या माहितीला दुजोराही दिला. 


'जंगल क्राई' या आगामी चित्रपचटाच्या निमित्ताने अभय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यानच एका कार्यक्रमात त्याला लग्नाशी संबंधित प्रश्न विचारला गेला. शिवाय तो डेट करत असणाऱ्या मिस्ट्री गर्लविषयीसुद्धा प्रश्न विचारण्याच आले. यावर उत्तर देत, 'माझं लग्न होणार आहे...' अशा शब्दांत त्यानं उत्तर दिलं. 


अभयनं फार काही महिती दिलेली नाही, तरीही त्याचं हे उत्तरही चर्चांना वाव मिळण्यास पुरेसं ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच अभयनं त्याच्या कथित प्रेयसीसोबते काही फोटो शेअर केले होते. 'माझी नॉन बायनरी डॉ़ल', असं त्यानं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. 



अभय 2021 पासून शिलो शिव सुलेमान हिला डेट करत असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आली होती. त्यानं तिच्यासोबतचे फोटो शेअर करताच इथं कलाजगतात कल्ला पाहायला मिळाला होता.