उतारवयात धर्मेंद्र यांनी व्यक्त केलं `या` अभिनेत्रीवरील प्रेम; भावना व्यक्त करायला इतका उशीर का?
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ते नेहमी काही ना काही पोस्ट शेअर करत असतात, ज्याला खूप पसंती दिली जाते. आता धर्मेंद्र यांनी एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर लोकं जोरदार कमेंट करत आहेत.
धर्मेंद्र यांनी शेअर केला रोमँन्टिक फोटो
धर्मेंद्र यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते शबाना आझमीसोबत दिसत आहेत. धर्मेंद्र यांनी निळ्या रंगाचा ब्लेझर घातला आहे. त्याचबरोबर शबाना गुलाबी आणि निळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहेत. धर्मेंद्र आणि शबाना यांनी एकमेकांना मिठी मारली आहे. धर्मेंद्र शबानाकडे प्रेमाने पाहत आहेत. हा फोटो पोस्ट करताना धर्मेंद्र यांनी प्रेमाबद्दल लिहिलेल्या ओळींची खूप चर्चा होत आहे.
फोटोसोबत लिहीलं खास कॅप्शन
त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'इश्क है मुझे कैमरा से... और कॅमेरा को...शायद मुझसे'. धर्मेंद्र यांच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. कुणी तिला लेजेंड म्हणतंय, तर कुणी म्हणतय की, कॅमेरा तुमच्यावर अशीच अनेक दशकं प्रेम करेल. करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो असल्याची माहिती आहे. या चित्रपटात धर्मेंद्र-शबानाशिवाय रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.