मुंबई : बॉलिवूडचे हीमॅन म्हटले जाणारे अभिनेते धर्मेंद्र आज 86 वा वाढदिवस साजरा करत आहेत. धर्मेंद्र यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. धर्मेंद्र यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. धर्मेंद्र यांनी ऑन स्क्रिन रोमान्स करूनच नाही, तर आपल्या वागण्यामुळे चाहत्यांची मने जिंकली आहेत. धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील नसराली येथे झाला, त्यांचे वडील शाळेचे मुख्याध्यापक होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मेंद्र हे फिल्म इंडस्ट्रीतील काही स्टार्सपैकी एक आहेत, ज्यांनी 100 हून अधिक हिट चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते, या अभिनेत्याची बॉलिवूड उद्योगात यशस्वी अभिनय कारकीर्द होती.


धर्मेंद्र आजकाल चित्रपटांमध्ये कमी दिसत असले तरी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत जोडलेले असतात आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करत असतात. अशा परिस्थितीत धर्मेंद्र यांचे चित्रपट जीवन सोडून त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसे होते, याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना देखील फार उत्सुक्ता आहे.


धर्मेंद्र यांचे खरे नाव धरम सिंग देओल आहे.


ऍक्शन हिरोपासून ते लव्हर बॉयपर्यंत सर्वच व्यक्तिरेखा या अभिनेत्याने साकारल्या आहेत. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' मधून करिअरला सुरुवात केली. 1960 ते 1970 या काळात त्यांनी अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले. गेल्या तीन दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीवर धर्मेंद्र यांचा दबदबा होता. धर्मेंद्र यांचे खरे नाव धरम सिंग देओल आहे. चित्रपटात येण्यापूर्वी त्यांनी आपले नाव बदलले.


धर्मेंद्र यांनी हेमासाठी ओलांडल्या सर्व मर्यादा


असे सांगितले जाते की, हेमा मालिनी यांच्याशी रोमान्स करण्यासाठी धर्मेंद्रन हे एक अनोखा मार्ग स्वीकारायचे, हेमा मालिनी यांच्यासोबत रोमान्स करण्यासाठी धर्मेंद्र स्वत:च्याच चित्रपटाच्या कॅमेरामनला लाच देत असत, जेणेकरून त्यांना अभिनेत्रीसोबत जास्त वेळ घालवता यायचा.


हेमा मालिनीसोबत लग्न करणं धर्मेंद्र यांना सोपं नव्हतं, कारण त्यांचा आधीत एक विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीने धर्मेंद्रला घटस्फोट देण्यास नकार दिला. यानंतर धर्मेंद्रने लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला.


21 ऑगस्ट 1979 रोजी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या दोघांनीही इस्लाम स्वीकारताना त्यांची नावे बदलली. धर्मेंद्र यांचे नाव बदलून दिलावर खान ठेवण्यात आले आणि हेमाचे नाव आयेशा बी ठेवण्यात आले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले, हेमा आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि आहाना या दोन मुली आहेत.