धर्मेंद्र यांच्या फार्महाऊसवर मद्यपान पार्टी, मित्राने अभिनेत्याचा कॅमेरासमोर केला पर्दाफाश
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. ईथे कोणता व्हिडिओ व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये सर्व सामन्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांचाच समावेश असतो.
मुंबई : धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये अर्जुन हिंगोरानीच्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' चित्रपटाद्वारे चित्रपटांच्या दुनियेत प्रवेश केला होता. 1970 च्या दशकात ते अॅक्शन स्टार बनले. धर्मेंद्र करण जोहरच्या रॉकी आणि राणीची प्रेमकथा या चित्रपटात दिसणार आहे. पण अभिनेत्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. ईथे कोणता व्हिडिओ व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये सर्व सामन्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांचाच समावेश असतो. असाच अभिनेते धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांच्या फार्म हाऊसवर दारु पार्टी सुरु असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्याने स्वत: ट्वीटरवर पोस्ट केला आहे. जो अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडिओ धर्मेंद्र यांच्या फार्म हाऊसवरील आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, हा व्हिडिओ धर्मेंद्र यांनी स्वत: रेकॉर्ड केला आहे. अभिनेत्याच्या प्रत्येक मित्राच्या हातात दारुचा ग्लास आहे. अभिनेत्याच्या एका मित्राने 'चीयर्स पाजी असं व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं आहे. यानंतर तिथे असलेले सगळे मोठ्याने म्हणतात.
धर्मेंद्रने कधीच दारु सोडली नाही आणि तो सोडनारही नाही. मी नेहमीच त्यांच्यासोबत दारु प्यायला बसतो. इतक्यात तो मित्र त्याच्या हातात असलेली उशी उलटी करतो. ज्यावर तुम्ही पाहू शकता की, धर्मेंद्र यांचा फोटो आहे. यानंतर तो म्हणतो की, 'पाजी चिअर्स. आज एप्रिल फूल आहे. एप्रिल फूल च्या शुभेच्छा.' धर्मेंद्र यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत दारू सोडल्याचं सांगितलं होतं.
त्यांचा हा विनोदी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'मित्रांनो माझे पियक्कड़ मित्र मला भेटण्यासाठी फार्म हाऊसवर आले होते'. अशा प्रकारे धर्मेंद्र आणि त्यांच्या मित्राने विनोदी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना एप्रिल फुल केलं आहे.
''मी आता दारु पीत नाही. दारुच्या व्यसनामुळे मी एक अभिनेता म्हणून खूप पूर्वीपासून स्वतःला उद्ध्वस्त केलं होतं. माझा आता मानवतेवर विश्वास आहे.'' असं वक्तव्य 2013 मध्ये प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान धर्मेंद्र यांनी केलं आहे.