बॉलिवूडमधील कलाकारांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता असते. झगमगत्या दुनियेतील हे कलाकार घरी कसे असतात. त्यांच्या मुलांची तर मजाच असते असा काहीसा समज सर्वसामान्यांना असतो. पण त्यांचं आयुष्य हे खूप वेगळं असतं. काहीस आपल्यापेक्षा कठीण आणि खडतड असतं. बॉलिवूडमधील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्याबद्दल अनेक बातम्या समोर येत असतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओलने आपल्या वडिलांच्या स्वभावाचे धक्कादायक खुलासे केले आहेत. ईशा देओलसाठी चित्रपट पदार्पण सोपं नव्हतं. कारण तिचे वडील धर्मेंद्र यांना तिचं चित्रपटात काम करण्याला विरोध होता. तर तिने वयाच्या 18 व्या वर्षी लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती. (Dharmendra wanted to marry his daughter Esha Deol at 18 This person doesn want to wear a skirt I lied to my parents)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशाने कबूल केले की तिला तिच्या वडिलांची समजूत काढण्यासाठी थोडा वेळ लागला, मात्र अखेरीस त्यांनी ते मान्य केलं. हॉटरफ्लायशी बोलताना ईशा म्हणाली की, तिचे वडील पूर्णपणे पुराणमतवादी आहेत. त्यामुळे तिने लहान वयातच लग्न करावं. त्यामागे कारण असं होतं की, आजूबाजूला त्यांनी हेच पाहिले आहे. ईशा म्हणाली, 'त्यांना मी चित्रपटात यावं असं वाटत नव्हतं. ते थोडे पुराणमतवादी आहे, आणि बरोबरच आहे... ते पंजाबी वडील आहे, आणि आपण वयाच्या 18 व्या वर्षी लग्न करून स्थायिक व्हावे अशी त्यांची इच्छा होती. हीच त्याची कंडिशनिंग आहे, ते अशा ठिकाणाहून आला आहे जिथे त्याच्या कुटुंबातील सर्व महिला त्याच पद्धतीने वाढल्या आहेत. पण माझे संगोपन खूप वेगळे होतं.


ईशाने सांगितले की. ती तिची आई हेमा मालिनी यांच्याकडे पाहून मोठी झाली आणि तिच्या चित्रपटातील कारकिर्दीचा खूप प्रभाव पडला. तिलाही स्वतःचं नाव कमवायचं होतं. पण वडिलांची समजूत काढण्यासाठी त्याला थोडा वेळ लागला. ती म्हणाली, 'मला माहित होतं की मला कोणीतरी व्हायचं आहे, पण त्यांना पटवायला थोडा वेळ लागला. हे सोपं नव्हतं, पण आजची गोष्ट वेगळी आहे.' धर्मेंद्र यांना त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरपासून सनी आणि बॉबी देओल ही दोन मुलं आहेत आणि 2002 मध्ये ईशाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा ते दोघेही मोठे स्टार बनले होते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)


ईशाने सांगितलं की, 'ती कठोर वातावरणात वाढली कारण तिची आजी तिला शॉर्ट स्कर्ट आणि स्पॅगेटी टॉप घालू देत नव्हती. माझी आजी खूप कडक होती. आम्हाला स्पॅगेटी आणि शॉर्ट स्कर्ट घालून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. आम्हाला काही वेळा रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे ती बाहेर जाण्यासाठी तिच्या पालकांशी खोटे बोलत असे तेव्हा ती बंडखोरीच्या टप्प्यातून गेली होती.'