मुंबई : मराठी अभिनेता, शिवसेना चित्रपट सेनेचा कार्याध्यक्ष सुशांत शेलार याच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना घडलीय. या घटनेत सुशांतच्या गाडीचं मोठ नुकसान झालय. याप्रकरणी एन एम जोशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सुशांत शेलार याच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करून गाडीची तोडफोड केली. गाडीची तोडफोड का आणि कुणी केली, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं सुशांतने म्हटलं आहे.  पोलीस या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासत असून ही घटना नक्की कोणी घडवून आणली का? याबाबत तपास सुरु आहे.



सुशांत माध्यमांशी बोलताना म्हणाला की, १५ तारखेला मध्यरात्री २ च्या दरम्यान एका अज्ञाताने हल्ला करून गाडीची काच फोडली. त्याने असं का केलं हे तर मला माहीत नाही, पण मी याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल करणार आहे. हा भ्याड हल्ला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.