ढिंचॅक पूजाचं नवीन गाणं प्रदर्शित... युजर्स करतायेत ट्रोल
ढिंचॅक पूजा पुन्हा एकदा चर्चेत...
मुंबई : 'सेल्फी मैने लेली' या गाण्यातून प्रसिद्धीझोतात आलेल्या ढिंचॅक पूजाचं नवं गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. सध्या पूजाच्या नव्या गाण्याची चर्चा होत असली तरी तिला ट्रोल करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. तिच्या नव्या गाण्याचं नाव 'आय एम ए बायकर'असं आहे. पहिलं गाणं 'सेल्फी मैने लेली' यूट्यूबवर अपलोड केल्यानंतप पूजा रातोरात स्टार झाली.
तिच्या गाण्यांमध्ये लय, सूर, ताल इत्यादी गोष्टींचा कमी असली तरी ती तिचं काम सुरू ठेवते. आता काळ्या कपड्यांमध्ये आणि एका बायकरच्या रूपात पूजा युट्यूबच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीस आली आहे. पण तिच्या नव्या गाण्यावर अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
"आय एम ए बायकर, जैसे कोई टायगर, मोटे थोड़ी डाइट कर, तू भी मुझे लाइक कर..." असं तिच्या गाण्याचे बोल आहेत. पण तिला कोणी लाईक करत नसून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
@Dhinchak Pooja या युट्यूबन चॅनलवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शेअर केल्याच्या दोन दिवसांतच या गाण्याला 82 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या या चॅनलवरील कमेंट सेक्शन बंद करण्यात आलं आहे.