मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर 'धुरळा' उडणार, राज्यात सत्ताबदल घडणार, 'या' हेडलाईनने रविवारी सकाळी सर्वत्र खळबळ उडवून दिली. याबाबत अधिक माहिती गोळा केल्यानंतर समजलं की, ही कोणत्याही राजकीय स्वरुपाची बातमी नसून 'धुराळा' या चित्रपटाची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'धुरळा' या सिनेमाचा World Television Premier लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग 'धुरळा' सिनेमामुळे चर्चेत आला होता. 


सध्याचा राजकारणावर भाष्य करणारा हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय आहे. राजकारणात नेमकं कधी काय होईल याची कल्पना नसते. हेच वास्तव या सिनेमातून मांडल आहे.  



समीर विद्वांस दिग्दर्शित सिनेमाचा भरपूर चर्चेत आहे. मुलभूत गरजा पाणी, सुलभ शौचालय आणि शिक्षण यासाठी माणसाने झगडलं पाहिजे आणि ते मागून घेतलं पाहिजे. गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा 'धुरळा' हे सगळेच पैलू या सिनेमात उलगडण्यात आले आहेत.