मुंबई : बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी ठरलेल्या रेखा या नुकत्याच लाईव्ह सिंगिग शो रायझिंग स्टार्समध्ये दिसल्या. या कार्यक्रमात रेखा यांच्या सुंदरतेने सगळ्यांनाच घायाळ केलं. रेखा कधीही टी व्ही शोवर जातात तेव्हा त्या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त होते. इथेपण काहीस असंच झालं. सुरूवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत रेखा यांची उपस्थिती खास ठरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात स्पर्धकांनी रेखा यांच्याच सिनेमांची गाणी सादर केली. तर काहींनी रेखा यांची लोकप्रिय डायलॉग बोलून कार्यक्रम सुंदर बांधून ठेवला. कार्यक्रमात रेखा यांनी देखील ठेका धरला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.



तामिळमध्ये ‘चुम्मा’ला ‘Simply’ म्हणतात, असे त्यांनी सांगितले. याच क्रमात रेखांना ‘जुम्मा चुम्मा’आठवले. अर्थात त्यांनी लगेच विषय बदलला. यानंतर शोमध्ये बराच वेळ ‘Simply’ची चर्चा रंगली. हा शब्द सगळ्यांच्या तोंडी दिसला. आश्चर्य म्हणजे, बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापर्यंतही हा शब्द पोहोचला. खरे तर ते शोमध्ये नव्हते. पण या शोनंतर काही वेळात त्यांनी एक  ट्विट केले. महत्वाची गोष्ट म्हणजे रायझिंग स्टार हा कार्यक्रम 9 ते 11 या वेळेत असतो. आणि बिग बी यांच हे ट्विट 10.45 चं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियात अशी चर्चा आहे की, बिग बी अमिताभ बच्चन यांनी हा कार्यक्रम पाहिला.