मुंबई : बॉलिवूडची स्लिम ट्रिम गर्ल करीना कपूर खान सध्या आपल्या स्टेटमेंटमुळे भरपूर चर्चेत आहे. सध्या करीना कपूर आपल्या 'वीरे दी वेडिंग' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमांत करीना कपूर कालिंदी नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. कालिंदी ही मुलगी कायम आपल्या कमिटेमेंटपासून दूर जाणारी दाखवली आहे. तिला प्रेम होतं पण जेव्हा जबाबदारीची गोष्ट येते तेव्हा ती त्यापासून दूर जाते. 


काय म्हणाली करीना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाच्यावेळी जेव्हा करीनाला विचारलं की, तुला कोणता अभिनेता हा फिट वाटतो. म्हणजे कमिटमेंटच्या बाबतीत कोणता अभिनेता परफेक्ट आहे.  तेव्हा तीने कोणताही विचार न करता रणबीर कपूरचं नाव सांगितलं. करीनाने या कॅरेक्टरसाठी रणबीर योग्य असल्याचं सागंतिलं. कारण करीनाला असं वाटतं की रणबीर हा कमिटमेंटचा पक्का आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या अफेअर्सची चर्चा रंगली आहे. आलिया - रणबीर ब्रम्हास्त्र या सिनेमानिमित्त एकत्र पाहायला भेटणार आहेत. 


करीना कपूरचा वीरे दी वेडिंग हा सिनेमा चर्चेत राहीला आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये करीनासोबत सोनम कपूर, शिखा तालसनिया आणि स्वरा भास्कर हे मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा करीना कपूरवर आधारित आहे. करीनाच्या लग्नाकरता तिचा मित्र परिवार तेथे उपस्थित राहतो. आणि तेथूनच ही गोष्ट सुरू होते. हा सिनेमा 1 जून रोजी रिलीज होणार आहे.