Shah Rukh Khan Viral Video : बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. शाहरुखचा हा व्हिडीओ एका भारतीय मुलानं न्यूयॉर्कच्या एका स्टोअरमधला असल्याचं सांगितलं आहे. त्यानं शाहरुख खान आणि लेक सुहाना खान यांना स्पॉट करताच हा व्हिडीओ शेअर केला. इतकंच नाही तर एका नेटकऱ्यानं हा व्हिडीओ पाहताच शाहरुख खूप रूड वागला का असा प्रश्न विचारला तर त्यावर त्यानं खरं उत्तरही दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक भारतीय कॉन्टेंट क्रिएटर ज्याचं नाव बंटी भैया असं आहे. त्यानं शाहरुख खान आणि सुहाना खानला एकत्र बूट खरेदी करताना स्पॉट केलं. कॉन्टेंट क्रिएटर न्यू बॅलेंस स्टोरवरचा हा व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओत त्यानं म्हटलं आहे की शाहरुख खान आणि सुहाना खान इथे आले आहेत. त्यानंतर त्यानं हा व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच शेअर केला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

व्हिडीओमध्ये शाहरुख खान आणि सुहाना हे दोघं ही स्टोरमध्ये फिरताना दिसत आहेत. त्यासोबत ते बूट ट्राय करताना दिसत आहेत. तर कॉन्टेंट क्रिएटरनं शेअर केलेल्या या व्हिडीओ क्लिपला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. इतकंच नाही तर लोक त्यावर कमेंट देखील करताना दिसत आहेत. 


अनेकांनी यावेळी त्याला विचारलं की शाहरुख तिथे कसा वावरत होता? काहींनी बंटीला विचारलं की त्याच्यासोबत शाहरुख रूड वागत होता का? एक नेटकरी म्हणाला, 'तो खूप चिडतो. तू त्याला भेटलास किंवा त्याच्याशी बोललास?' त्यावर उत्तर देत त्या क्रिएटरनं उत्तर दिलं की 'नाही, तो असा नाही. जी कोणी व्यक्ती त्याच्याजवळ जात होती. तो सगळ्यांशी बोलत होता.' दुसऱ्या एका नेटकऱ्यानं विचारलं की शाहरुख खान आणि सुहाना खानशिवाय तिथे आणखी कोणी होतं का? कारण त्याचा मोठा मुलगा आर्यन किंवा धाकटा मुलगा अबराम नेहमी त्याच्यासोबत असतात. त्यावरही उत्तर देत बंटीनं लिहिलं की 'नाही आणखी कोणी नव्हतं.' फक्त ते दोघेच होते. 


हेही वाचा : बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रीला होत्या 4 आई, एवढं मोठं कुटुंब असूनही आज एकटीच!


दरम्यान, शाहरुख खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'किंग'च्या कामात व्यग्र आहे. चित्रपटाच्या घोषणेसोबतच चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. त्याचं कारण म्हणजे शाहरुखचे एका मागे एक तीन चित्रपट हे ब्लॉकबस्टर हिट झाले. तर या सगळ्यात शाहरुख खान आणि लेक सुहाना खान हे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. शाहरुखचं त्याची लेक सुहानासोबतची बॉन्डिग ही खूप चांगली आहे.