Shraddha Kapoor Rumourd Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. त्याचं कारण ती आणि तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी हे एकत्र स्पॉट झाले. मात्र, त्या दोघांनी अजून त्यांच्या नात्याविषयी अधिकृत काहीही माहिती दिलेली नाही. मात्र, श्रद्धा कपूरच्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा आहे की तिनं आता तिचं रिलेशनशिप अधिकृत केलं आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय प्रकरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रद्धानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काल काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रद्धानं पर्पल रंगाचा नाईट सूट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत श्रद्धानं "काही नाही, श्रृंडे आहे तर काही करु शकत नाही." मात्र, या सगळ्यात श्रद्धाच्या लॉकेटनं लक्ष वेधलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्या लॉकेटमध्ये 'R' हे अक्षर आहे.   



श्रद्धानं ही पोस्ट शेअर करतात नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रया दिल्या आहेत. एका नेटकरी म्हणाला, आर... हे काय आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, या आरमुळे राहुल मोदी कन्फर्म झालं. तिसरा नेटकरी म्हणाला, आरचा अर्थ काय आहे? आणखी एक नेटकरी म्हणाला, या आर नावाच्या लॉकेटचं रहस्य काय आहे. मात्र, श्रद्धा किंवा राहुलनं कोणीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिलेला नाही. 


कोण आहे राहुल मोदी?


राहुल मोदी हा मुंबईचा आहे. त्याचं शिक्षणही इथेच झालं. त्यानं त्याचं शिक्षण विसलिंग वूड्स इंटरनॅशनल इंस्टीट्यूटमधून शिक्षण पूर्ण केलं. त्यानं 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्यार का पंचनामाच्या सेटवर इंटर्नशिप पूर्ण केली. त्यानंतर त्यानं आकाश वाणीसारख्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्याचे वडील आमोद हे एक व्यावसायिक आहेत. रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा आणि राहुल हे दोघं 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान, जवळ आल्याचे म्हटले जाते. 


हेही वाचा : जान्हवी कपूरचे तिरुमला दौरे का वाढले? काय आहे कनेक्शन? अखेर तिनेच केला खुलासा


श्रद्धाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सगळ्यात शेवटी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासोबत रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. दरम्यान, आता श्रद्धा लवकरच 'स्त्री 2' या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरतेनं प्रतिक्षा आहे.