`तारक मेहता...`मधील सोनूने मोडला शोचा करार? निर्माते कायदेशीर नोटीस पाठवण्याच्या तयारीत
`तारक मेहता का उल्टा चश्मा` या टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या मालिकेबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. निर्माते लवकरच अभिनेत्री पलक सिधवानीला कायदेशीर नोटीस पाठवण्याची शक्यता आहे. काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : मालिकेबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. मालिकेतील सोनूची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे निर्माते लवकरच अभिनेत्री पलक सिधवानीला कायदेशीर नोटीस पाठवण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री पलक सिधवानी तिच्या करारातील महत्त्वाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. ज्यामुळे तिचे पात्र, मालिका, कंपनी आणि ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मचे महत्त्वपूर्ण नुकसान झाले आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की पलकने 'थर्ड पार्टी एंडोर्समेंट' केलं आहे. हे करण्यासाठी तिने कोणालाही माहिती दिली नाही किंवा लेखी संमती दिली नाही. अशा परिस्थितीत पलकने 'एक्सक्लुझिव्हिटी क्लॉज'चे उल्लंघन केले आहे. या संदर्भात पलकला कायदेशीर नोटीस जारी करायची की नाही यावर प्रॉडक्शन हाऊस विचार करत आहे. मात्र, प्रॉडक्शन हाऊसने तिला भविष्यात असे कोणतेही पाऊल न उचलण्याचा इशारा दिला आहे. ज्यामुळे तिच्या 'सोनू भिडे' या चात्राला इजा होईऊ.
पलक सिधवानीला नोटीस पाठवणार!
पलक सिधवानीच्या या चुकीमुळे मालिकेला चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. अभिनेत्रीला सर्वप्रथम इशारा दिल्यानंतर प्रॉडक्शन हाऊस या पावलांचा विचार करत आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये सोनूची भूमिका साकारणारी पलक सिधवानी चार वर्षांपूर्वी या शोमध्ये सहभागी झाली होती. यापूर्वी ती निधी भानुशाली ही भूमिका करत होती. तिने या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेच्या प्रेक्षकांशी तिने एक मजबूत बंधही निर्माण केला आहे.
16 वर्षांपासून सुरु आहे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'
पलक सिधवानीने तिच्या सहकलाकारांशी, विशेषत: तिचे ऑन-स्क्रीन आई-वडील, सोनालिका आणि मंदार यांच्याशी चांगले संबंध शेअर केले आहेत. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारी मालिका आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांनी सेटवर तो खास क्षण खास पद्धतीने साजरा केला आहे.