मुंबई : कॉमेडी टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ला नुकतीच 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2008 मध्ये प्रसारित झालेला हा कॉमेडी शो अजूनही लोकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. जेठालाल असो, बबिता जी असो किंवा बापूजी, या टीव्ही सिरियलमध्ये दिसणारी पात्रं आज प्रत्येक घरात लोकप्रिय आहेत. या सीरियलला 13 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आपल्या या लाडक्या स्टारकास्टचा पगार किती आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलीप जोशी: तारक मेहता का उल्टा चश्मामधील 'जेठालाल' असलेल्या हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांच्या व्यक्तिरेखेने घरोघरी लोकप्रियता मिळवली. तारक मेहता का उल्टा चश्मा ने दिलीप यांना केवळ लोकप्रिय स्टारच बनवले नाही तर दिलीप यांना टीव्ही इंडस्ट्रीचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता देखील बनवलं आहे. एका वृत्तानुसार, दिलीप या कॉमेडी शोच्या एका भागाचं चित्रीकरण करण्यासाठी 2-3 लाख रुपये घेतात.


मुनमुन दत्ता: 'बबिता जी'च्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आजही या टीव्ही शोमुळे खूप लोकप्रिय आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुनमुनला प्रति एपिसोड 35 ते 50 हजार रुपये मिळतात.


अमित भट्ट: अभिनेता अमित भट्ट यांनी तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बाबूजी'च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अमित भट्ट यांना प्रत्येक भागासाठी 70 ते 80 हजार रुपये फि दिली जाते.


मंदार चांदवडकर: एका वृत्तानुसार सीरियलमध्ये आत्माराम भिडेच्या भूमिकेत दिसणार्‍या मंदार चांदवडकर यांना प्रति भाग 80-90 हजार रुपये दिले जातात.


शैलेश लोढा: 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये लेखक तारक मेहताच्या भूमिकेत दिसणारे शैलेश लोढा यांना एक एपिसोड 1 ते 2 लाख रुपये मिळतात.