अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून सुट्टी!
ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून डिस्जार्च देण्यात आलाय.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून डिस्जार्च देण्यात आलाय.
डिहायड्रेशन आणि त्यानंतर किडनीचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. दिलीप कुमार यांच्यावर डॉ. जलील पालकर आणि त्यांची टीम उपचार करत होती.
रुग्णालयातून डिस्जार्च दिल्याची माहिती दिलीप साहेबांचे फॅमिली फ्रेण्ड फैसल फारुकी यांनी दिली. तसंच दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांची पत्नी सायरा बानो यांनीही याबद्दल माहिती दिलीय... तसंच सर्वांचे आभारही मानलेत.