मुंबई : अभिनेता दिलीप प्रभावळकर यांच नाव अष्टपैलू अभिनेत्यांमध्ये घेतला जातो. नाटक असो, चित्रपट असो किंवा मग मालिका प्रत्येक क्षेत्रात दिलीप प्रभावळकर यांनी स्वतःचं असं खास स्थान निर्माण केलं आहे. केवळ अभिनयातच नाही तर लेखनातही प्रभावळकर यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. आज दिलीप प्रभाळकरांचा 77 वा वाढदिवस आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलीप प्रभावळकर यांनी फक्त मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटात महात्मा गांधी यांची भूमिका साकारली होती आणि ही भूमिका चांगलीच गाजली होती. या भूमिकेसाठी त्यांच खास कौतुक करण्यात आलं होतं. 


चित्रपटाच्या चित्रीकरणाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा दिलीप प्रभावळकर सेटवर लवकर जायचे आणि महात्मा गांधींचा मेकअप करत सेटवर हजर रहायचे. या चित्रपटात संजय दत्तनं मुख्य भूमिका साकारली होती. संजय नेहमीच प्रभावळकरणांना गांधीजींच्या भूमिकेत पाहायचा पण एक दिवस प्रभावळकर गांधीजींच्या मेकअपमध्ये नव्हते. संजय सेटवर आला आणि तो अनोळखी नजरेनं प्रभावळकरांकडे पाहू लागला आणि नंतर तो त्यांना निरखूव पाहू लागला, मग त्याच्या लक्षात आलं की हे तर दिलीप प्रभावळकर आहेत. गांधीजीच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर समरसून गेले होते म्हणून संजय देखील त्यांना ओळखू शकला नाही. 


दिलीप यांनी 'हसवाफसवी' नाटकात एक नाही तर सहा भूमिका साकारल्या. प्रभाळकरांनी साकारलेला 'चिमणराव' आजही अनेकांच्या मनात आहे. त्यांनी आजपर्यंत ज्या ज्या भूमिका साकारल्या आहेत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागी केली. त्यात चौकट राजामधील नंदू, झपाटलेला मधील तात्या विंचू, गंगाधर टिपरेमधील आबा अशा अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या.