Diljit Dosanjha Concert : लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या कॉन्सर्टमध्ये व्यग्र आहे. त्याचा नुकताच एक कॉन्सर्ट हा जयपुरमध्ये रविवारी झाला. या कॉन्सर्टमध्ये लाखोच्या संख्येनं हजेरी लावली होती. यासगळ्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. आता ही माहिती समोर आली आहे की चोरांनी 32 मोबाईल चोरी केले. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये त्याची तक्रार नोंदवण्यात आली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 32 नाही तर 100 पेक्षा जास्त फोन चोरी झाले आहेत. त्यातून फक्त 32 फोन चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कॉन्सर्टमध्ये ज्या लोकांचे फोन चोरी झाले आहेत. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत दिलजीतकडे देखील मदत मागितली आहे. त्यांनी दिलजीतकडे मदत मागितली आहे की त्यांना त्यांचे फोन परत मिळवून देण्यासाठी मदत केली. त्याच्या काही चाहत्यांनी याचा व्हिडीओ तयार करत त्याच्याकडून मदत मागितली आहे. 


दिलजीतचा हा कॉन्सर्ट रविवारी जयपुरच्या सीतापुरामध्ये जयपुर एग्झीबिशन अॅन्ड कन्वेंशन सेंटर (JECC) मध्ये झाला. या कॉन्सर्टमध्ये त्याच्या लाखो चाहत्यांनी हजेरी लावली होती. हा कॉन्सर्ट संपल्यानंतर जयपुर पोलिसांनी ही माहिती दिली की यावेळी अनेक फोनची चोरी झाली. पोलिसांनी यावेळी चोरी झालेल्या फोनला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून चोर हाती येतील. 


हेही वाचा : विकेंडचा आनंद घ्या OTT वर; पाहा हे 7 नवे चित्रपट आणि सीरिज


याच कॉन्सर्टमध्ये दिलजीतनं त्याच्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर दिलजीतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो त्याला पंजाबी असण्यावर गर्व असल्याचं बोलताना दिसतो. यावेळी दिलजीत म्हणाला की "जेव्हा मी पंजाबमधून बाहेर जातो, तेव्हा मी बोलतो की मी पंजाबी आहे. पण अनेकांना हे आवडत नाही. ते का हे मला माहित नाही? मी आहे पंजाबी आणि हे जेव्हा सांगतो तेव्हा लोकांना का इतका त्रास होतो. त्यानं पुढे सांगितलं की जेव्हा तुम्ही जयपुरमधून बाहेर जाता तर तुम्ही म्हणाला की मी जयपुरचा आहे. तर मी पंजाबी आहे हे सांगितल्यानंतर लोकांना का आवडत नाही." दिलजीतनं त्याच्या या कॉन्सर्टमध्ये पंजाबी गाणी गायली आणि प्रेक्षकांच्या ती पसंतीस उतरली. तिथे आलेले प्रेक्षक हे खूप उत्साही झाल्याचे पाहायला मिळाले.