मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. दीपिका आणि तिचा पती शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) यांची जोडी तर चाहत्यांच्या पसंतीस नेहमीच उतरते. अलिकडेच शोएबची बहीण सबा इब्राहिम लग्नात वहिनी दीपिका मेहनत करत असल्याचे आपण पाहिले. दीपिका आणि शोएबनं मिळून सबाचं धुमधुमामध्ये लग्न केलं. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी सबा इब्राहिमला पश्चाताप होऊ लागला आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय झालं आहे. (dipika kakar shoaib ibrahim)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाची नणंद सबा इब्राहिम सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती एक यूट्यूबर आणि सोशल मीडिया इनफ्लुएंसर आहे. लग्नानंतरही सबा इब्राहिम सतत नवनवीन व्हिडिओ शेअर करताना दिसते.  नुकताच तिनं पती खालिदसोबतचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.(shoaib ibrahim saba ibrahim) 


हेही वाचा : लग्न करणं अभिनेत्रींसाठी शाप? प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जीवनातील संघर्ष, Casting Couch बाबत म्हणाली...


सबाने नवीन व्हिडिओमध्ये तिच्या पतीच्या आवडत्या गाण्याबद्दल सांगितले आहे. सबा मजेशीरपणे म्हणते, 'आजकाल खालिदला 'मुश्किल गले पड गई...' हे गाणं आवडतं. सबाने नवीन व्लॉगला शेअर करत 'शादी से अभी से पछतावा' असे नाव दिले आहे. (dipika kakar shoaib ibrahim sister saba ibrahim regretting after marriage video viral on internet) 



सबा या नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये म्हणते, 'लग्नापूर्वी तिला असं वाटायचं की माझं सासरं नक्की कसं असेल, ती कशी राहणार आणि काय करेल. पण तिनं जो विचार केला ते काही झालं नाही. तिला कोणत्याही गोष्टीसाठी बंधन नाही. सबा तिच्या वहिनी दीपिकाप्रमाणेच कुटुंबातील सदस्यांना खूश करण्याचा प्रयत्न करणार आहे. सोशल मीडियावर सबा इब्राहिम आणि खालिदच्या या मजेदार व्हिडिओला लोक पसंत करत आहेत.