मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका  कक्कडने नुकताच तिच्यासोबत घडलेला एक प्रकार ट्विटरच्या माध्यामातून शेअर केला आहे. एका कॅब ड्रायव्हरने तिच्यासोबत केलेला गैरव्यवहार दीपिकाने सोशल मीडीयाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. दीपिकाने ओलाच्या कॅब सर्व्हिसच्या वाईट अनुभवाबद्दल लिहले आहे. 


काय घडले ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाने लिहलेल्या पोस्टनुसार, तिने एक कॅब बुक केली. गाडीत बसल्या नंतर तिने ड्रायव्हरला गाडी सावकाश चालवण्यासाठी सांगितले. मात्र ड्रायव्हर दीपिकाशी उद्दमपणे बोलत होता. त्याने दीपिकाला खाली उतरण्यास सांगितले. अशाप्रकारचा दीपिका आलेला हा दुसरा अनुभव आहे.  


 



ट्विटरवर शेअर केला स्क्रीनशॉर्ट  


दीपिकाने ट्विटर अकाऊंटवर स्क्रिनशॉर्ट शेअर करत  तक्रार दाखल केली  आहे. स्वतःची कार एकदिवस नसणं हे खूप त्रासदायक ठरू शकते. मी कॅब बूक केली. कॅबमध्ये बसली तेव्हापासून ड्रायव्हर अत्यंत रॅश ड्रायव्हिंग करत होता. जेव्हा मी गाडी सावकाश चालवायला सांगितली तेव्हा उद्दामपणे ड्रायव्हरने मला खाली उतरायला सांगितले.  


ओला  केले डिलिट 




ओलाने दीपिकाला पुढील राईड बुक करताना फाईन भरावा लागेल असे सांगितले. त्यामुळे तिने ओला अ‍ॅप डिलिट केले आहे. नुकतेच शोएब इब्राहिमसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर दीपिका 'ससुराल सिमर का' या कार्यक्रमामध्ये झळकली होती. शोएबशी लग्न झाल्यानंतर तिने इस्लाम कबुल केला. त्यावेळेस सोशल मीडियावर दीपिका ट्रोल झाली होती. ट्रोलर्सना उत्तर देताना तिने हा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देणं गरजेचे वाटत नसल्याचे म्हणत ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केले होते.