Dipika Kakkar Trolled on Holi: होळीचा सण हा सगळ्यांसाठीच सेलिब्रेशनाचा (Holi Celebration) असतो. तेव्हा चमचमीत गोड पदार्थांपासून ते रंग खरेदी आणि बनवण्यापर्यंत तयारीची लगबग असते. कालच आपण सगळ्यांनी होळीचा सण साजरा केला आहे. आपण त्यानिमित्तानं भरपूर फोटोजही काढले असतील. त्यामुळे होळीच्या दिवशी सगळ्यांचाच उत्साह हा शिगेला गेलेला असतो. बॉलिवूडच तर टेलिव्हिजन अभिनेत्री आणि अभिनेतेही सेलिब्रेशनच्या बाबतीत कायमच पुढे असतात. यंदाही सोशल मीडियावर सेलिब्रेटींच्या होळीचा (Celebrity Holi Celebration) ट्रेण्ड पाहायला मिळाला होता. त्यामुळे सोशल मीडियावर सेलिब्रेटींच्या होळीचा ट्रेण्ड होता. त्यांचे फोटोजही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते होते. अनेकांनी आपल्या घरी तर बाहेर जाऊन सेलिब्रेटही केले आहे. अशाच एका सेलिब्रेटीची सध्या चर्चा आहे आणि ती म्हणजे दिपिका कक्करची (Dipika Kakkar). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही महिन्यांपासून दिपिका कक्कर (Dipika Kakkar Trolled) ही अभिनेत्री विशेष चर्चेत आली होती. अभिनेता शोएब अब्राहमसोबत (Shoyeb Abrahim) विवाहबंधनात अडकल्यानंतर दिपिका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. तिनं लग्नानंतर मुस्लिम धर्म स्विकारला आहे. त्यामुळे त्यावरून बराच गदारोळ झाला होता. ती अनेकदा ट्रोलही झाली होती. आता पुन्हा एकदा दिपिका पुन्हा एकदा यावरूनच ट्रोल झाली आहे. होळी सेलिब्रेशनवरून ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. यावेळी तिला ट्रोलर्सनी सुनावलं आहे. 


अभिनेत्री दीपिकानं आपल्या पतीसोबत म्हणजे शोएब अब्राहमसोबत होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिनं आपला बेबी बंपही फॉन्ट केला आहे. हाताला लागलेले रंग हे तिनं आपल्या बेबी बंपवरही लावले आहे आणि दोघांचा एकत्र फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या रॉमेण्टिक फोटोवरती त्यांच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत परंतु यावेळी दिपिकाला ट्रोलर्सकडून टिका सहन करावी लागली आहे. 


हेही वाचा - '... तर मला आवडलं नसतं'', पहिल्या भेटीतच मंदाकिनीच्या कपड्यांकडे पाहून Raj Kapoor काय म्हणाले होते?



का झाली दिपिका ट्रोल? 


हा फोटो इन्टाग्रामावर दिपिकानं शेअर केला आहे. ज्यावर ट्रोलर्सनं दिपिकाला ट्रोल केलं आहे. यामध्ये तुम्ही दोघं मुस्लिम आहात ना मग तसेच राहा, अशी एका युझरनं कमेंट केली आहे. तर एका युझरनं असं लिहिलं आहे की, तुम्ही असा खोटा ड्रामा का करत आहात. तुम्ही खऱ्या आयुष्यात तर तसे अजिबातच वागत नाहीत. बेबी बंप दाखवल्यानंही अनेकांनी दिपिकाला ट्रोल केलं आहे. एका युझरनं असं लिहिलं आहे की, तुम्हाला पोट दाखवणं काय गरजेच आहे का? अशा प्रकारे तिला तिखट भाषेत ट्रोल केलं आहे.